News

शेतकरी,शेती आणि महसूल विभागयांचे एक अतूट नाते आहे.आपल्याला माहित आहेच की,शेतीचे बरेचसे प्रश्नहे महसूल खात्याकडे असतात.

Updated on 29 March, 2022 10:32 AM IST

शेतकरी,शेती आणि महसूल विभागयांचे एक अतूट नाते आहे.आपल्याला माहित आहेच की,शेतीचे बरेचसे प्रश्नहे महसूल खात्याकडे असतात.

महसूल खाते ते प्रश्न सोडवण्याचे काम करते. परंतु महसूल खात्याने  असा काही पराक्रम केला आहे की, ऐकून थक्क व्हायला होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुलढाणा जिल्ह्यातील महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर विकल्या आहेत, अशा आशयाचा आरोप करण्यात येत आहे. एवढेच नाही तर या विरोधातस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्षप्रशांत डिक्कर यांच्यासह पीडित आदिवासी शेतकरीजिल्हाधिकारी कार्यालयासमोरआमरण उपोषणाला बसले आहेत.

नक्की वाचा:सर्वसामान्यांना चटका! रशिया युक्रेन युद्धामुळे खाद्य तेलाचे दर गगनाला

आदिवासी शेतकऱ्यांचे कागदपत्रातील अज्ञान तेच ठरत आहे अधिकाऱ्यांना वरदान

 शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे अधिकारी लोक परस्परच कागदपत्रांवर हेराफेरी करून संबंधित लोकांना जमिनीचा हवाला देत आहेत.

हा प्रकार आता उघडकीस आला असून शेतकऱ्यांनी थेट आमरण उपोषणाचा बडगा उगारला आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्यांना कागदपत्राबद्दल काहीच समजत नसल्यामुळे याचाच गैरफायदा घेत महसूल अधिकाऱ्यांनी जमिनी परस्पर विकले आहेत. सगळ्यात विशेष म्हणजे शेतकऱ्यांना याची पुसटशी कल्पना देखील नव्हती. जेव्हा शेतकरी जमीन कसायला गेले तेव्हा हा प्रकार त्यांच्या समोर आला.

नक्की वाचा:पाच दिवस महाराष्ट्र तापणार; विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पुढचे दिवस उष्णतेच्या कडाक्याचे

कागदपत्रांवर खाडाखोड करून हा महा प्रताप महसूल अधिकाऱ्यांनी केला आहे. असा त्यांच्यावर आरोप होत असून  संग्रामपूर तालुक्यातीलचिचारी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

या गावच्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर काही लोकांनी ताबा घेतला असून शेत जमीन कसायला गेल्यावर हा प्रकार उघडकीस आल्याने स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांना सगळा प्रकार शेतकऱ्यांनी सांगितला व आंदोलन पुकारण्यात आले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.

English Summary: farmer land sale revenue department officer in buldhana
Published on: 29 March 2022, 10:32 IST