आपल्याकडे आपण बघतो की दुधवाले हे सकाळी सकाळी येतात. त्यांच्याकडे एमएटी, सुझुकी, स्प्लेंडर, बजाज अशा गाड्या असतात. यामध्ये बदल झालाच नाही. याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. असे असताना यामध्ये आता बदल होत चालला आहे.
तुम्ही एखाद्या दूधवाल्याकडे 'हार्ले डेव्हिडसन' बघितली तर तुम्हाला ते खरे वाटणार नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती 'हार्ले डेव्हिडसन' या लक्झरी बाईकवर दुधाचे अवजड कंटेनर लटकवून ग्राहकांना दूध वाटप करताना दिसत आहे.
यामुळे या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. इतकेच नाही तर त्याच्या बाईकच्या नंबर प्लेटच्या ऐवजी इंग्रजीत 'गुर्जर' असे लिहिले आहे. अनेकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.
शेतकऱ्यांनो जास्त उत्पन्न काढा, पण पत्रकारांना उत्पन्न सांगू नका, शरद पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला
यामध्ये एक व्यक्ती 'हार्ले डेव्हिडसन' बाईकवर दुधाचे कॅन घेऊन जात असल्याचे दिसत आहे. ही लक्झरी बाईक विकत घेण्यापूर्वी सामान्य लोक 10 वेळा विचार करतात. कारण याची किंमत खूप असते, शेतकऱ्यांना ती घेणे तर अशक्यच असते.
असे असताना हा मात्र थाटात दुध विकायला हार्ले डेव्हिडसन बाईक वापरतो आहे. अनेकांच स्वप्न असलेल्या या आलिशान दुचाकीला दोन मोठे कॅन बांधून हा माणूस दूध विकतोय. यामुळे हा किती श्रीमंत असेल याचा अंदाज येईल.
लग्नात वाजवले फटाके आणि उसाला लागली आग, ६ लाखाचे नुकसान..
या व्हिडीओला दोन लाखांच्या जवळपास लाईक्स आणि 30 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकजण या व्हिडीओवर मजेशिर कमेंट्स करत आहेत. amit_bhadana_3000 याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांचे 100 टन उसाचे उत्पन्न बघून शरद पवारांनी लावला थेट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला फोन आणि...
गरिबांना मोफत रेशन देण्याचा केंद्राचा निर्णय, 81 कोटी नागरिकांना होणार फायदा
तीतर पालनातून करा लाखोंची कमाई, शेतकऱ्यांसाठी आहे फायदेशीर..
Published on: 03 January 2023, 11:27 IST