News

शेतकरी शेतीपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी जसे की, बियाणे, कीटकनाशके, खते, सिंचन व्यवस्था यांसारख्या सुविधांसाठी बरेचदा कर्ज काढत असते. तसेच शेतकऱ्यांना त्यांची शेती अधिक कार्यक्षमतेने चालवता यावी म्हणून शेती कर्जदेखील उपलब्ध करून दिले जातात.

Updated on 07 July, 2022 6:16 PM IST

शेतकरी शेतीपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी जसे की, बियाणे, कीटकनाशके, खते, सिंचन व्यवस्था यांसारख्या सुविधांसाठी बरेचदा कर्ज काढत असते. तसेच शेतकऱ्यांना त्यांची शेती अधिक कार्यक्षमतेने चालवता यावी म्हणून शेती कर्जदेखील उपलब्ध करून दिले जातात. मात्र या कर्जाची टप्या- टप्याने परत फेड होणे गरजेचे आहे. मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी कर्जफेडीकडे पाठच फिरवली असल्याची माहिती समोर आली आहे.

कर्जाची परतफेड न केल्याने नाशिक जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे,तसेच वादळामुळे शेतीपिकाचे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र गेल्या तीन ते चार वर्षांपासून या शेतकऱ्यांकडून जिल्हा बँकेच्या कर्जाची परतफेड होऊ शकली नाही.

कर्ज परतफेडीसाठी बँकेने 'सामोपचार कर्ज परतफेड योजना, जाहीर केली. या योजनेकडे कर्जदार असलेल्या सुमारे २६ हजार ७०० कर्जदारांपैकी २२ हजार कर्जदारांनी पाठ फिरवली असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. कर्ज फेडीसाठी मोठ्या प्रमाणावर सवलत देण्यात आली होती मात्र सवलत देऊनही कर्ज भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्जदारांविरुद्ध आता येत्या काळात कठोर कारवाई करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. 

बेकायदेशीररीत्या कर्जाचे वाटप, अतोनात खर्च शिवाय कर्जवसुलीला देण्यात आलेली स्थगिती यामुळे जवळपास दोन हजार कोटी रुपयांची थकबाकी कर्जदारांकडे आहे. याचा सगळ्यात मोठा फटका हा ठेवीदारांना झाला आहे. शिवाय बँकेचा प्रशासकीय खर्च भागवणेही आता मुश्कील झाले आहे. त्यामुळे आता येत्या काळात थकीत कर्जाची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांकडून भरली गेली नाही तर बँकेने कडक पावले उचलण्याचे ठरविले आहे.

कर्ज न भरणाऱ्या थकबाकीदारांची बँकेने यादी तयार केली आहे. यामध्ये जवळपास २६ हजार ७०० कर्जदार आहेत. बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, केवळ ४,११० कर्जदारांनीच आपली थकबाकी भरण्यास रस दाखवला आहे. त्यामुळे २२ हजार शेतकऱ्यांनी कर्जाकडे पाठ फिरवल्याने बँकेच्या उलाढालीवर परिणाम होऊ लागला आहे.

गोपीचंद पडळकरांना मंत्री करा!! कार्यकर्त्याने फडणवीसांना रक्ताने लिहिले पत्र

३० जून पर्यंत या योजनेची मुदत होती. यानंतर मुदत वाढ झाली नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. याबाबत बँकेने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा अचानक राजीनामा, चर्चांना उधाण
शेतकऱ्याची भन्नाट मागणी! म्हणे 'साहेब शेती परवडत नाही,हेलिकॉप्टर खरेदी साठी कर्ज द्या'! बँक अधिकारीही चक्रावले

English Summary: Farmer borrower, The financial condition of the bank has deteriorated
Published on: 07 July 2022, 04:35 IST