News

सध्या अफू शेतीचे बरीच प्रकरणे महाराष्ट्रात उघडकीस येत आहे. मागे इंदापूर तालुक्यातील आणि आणि जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वाळकी येथील प्रकरण ताजे असताना आता नाशिक जिल्ह्यातील फुलेनगर येथे अफु लागवडीचा प्रकार समोर आला आहे.

Updated on 19 March, 2022 12:11 PM IST

सध्या अफू शेतीचे  बरीच प्रकरणे महाराष्ट्रात उघडकीस येत आहे. मागे इंदापूर तालुक्यातील आणि आणि जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वाळकी येथील प्रकरण ताजे असताना आता नाशिक जिल्ह्यातील फुलेनगर येथे अफु लागवडीचा प्रकार समोर आला आहे.

याबाबतचे सविस्तर माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील फुलेनगर( माळवाडी) येथील एका शेतकऱ्याला अफू लागवडीच्या गुन्ह्याखाली पोलीस आणि महसूल विभागाचे एकत्रित कारवाई करत दोन लाख सात हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली.

हे नक्की वाचा:बेकरी उद्योग टाकायचा आहे? पण लागणाऱ्या यंत्रांची माहिती नाही, तर वाचा यंत्राविषयी सविस्तर माहिती

 माळवाडी शिवारात असलेल्या गट नंबर 405 या क्षेत्रामध्ये  अफूची शेती करण्यात येत असल्याची गुप्त माहिती वावी चे पोलीस निरीक्षक कोते यांना मिळाली होती. त्यानंतर कोते यांनी वरिष्ठ  कार्यालयाशी संपर्क साधत त्याबाबत माहिती दिली.

त्यानंतर नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे व उपाधिक्षक  सोमनाथ तांबे यांच्या आदेशानुसार मुसळगाव चे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, नायब तहसीलदार सागर मुंदडा  यांनी संयुक्तपणे छापा टाकला व संबंधितांवर कारवाई केली.

हे नक्की वाचा:कोथिंबीरीच्याय उत्पाादनात घट होण्यास कारणीभूत आहेत हे रोग, जाणून घेऊ या रोगांची माहिती आणि नियंत्रण

या संशयित शेतकऱ्याचे नाव विलास अत्रे असून त्याने मका पिकाचे आडोशाला अफूची लागवड केलेली होती. हे अफूचे पीक आता दोन ते अडीच फूट उंच वाढले होते व या पिकाला गोलाकार बोंडे व पांढऱ्या रंगाची फुले देखील आलेली होती. 

या कारवाईमध्ये पोलिसांनी चौदा गोण्या जप्त केले असून त्यांचे एकत्रित वजन 130 किलो आहे. याचा एकंदरीत किमतीचा अंदाजे विचार केला तर दोन लाख 60 हजार रुपये इतकी आहे. त्यानंतर संबंधित संशयित शेतकऱ्यावर अमली पदार्थाचे उत्पादन घेतले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English Summary: farmer arrest in phulenagar in nashik district due to cultivation to opium crop
Published on: 19 March 2022, 12:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)