सध्या अनेक ठिकाणी रोडची कामे सुरू आहेत. यामध्ये भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे मिळत आहेत. आता पुणे- पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्याबरोबरच जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या ठरणार्या रिंगरोडसाठी पहिले खरेदीखत मावळ तालुक्यातील उर्से गावात झाले आहे.
येथील संबंधित शेतकर्याला एकरी तब्बल 2 कोटी 80 लाख रुपयांचा विक्रमी मोबदला मिळाला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. समृद्धी महामार्ग, पालखी महामार्ग याला देखील मोठ्या प्रमाणावर पैसे देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे.
2007 मध्ये रिंगरोडचे नियोजन करण्यात आले होते. मात्र याकडे फारसे लक्ष दिले गेल्याने हे काम रखडले. जिल्ह्यातील सहा राष्ट्रीय महामार्गांना जोडणार हा रिंगरोड सुमारे 173 किलोमीटर असून, तब्बल 26 हजार 831 कोटींच्या प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
अमूल, मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची केली वाढ..
रिंगरोडसाठी आवश्यक असलेल्या जमिनीची मोजणी प्रक्रिया 99 टक्के पूर्ण झाली आहे. पश्चिम रिंगरोडचे दरदेखील निश्चित झाले. विक्रमी वेळेत रिंगरोडसाठी आता थेट भूसंपादन प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. याला मिळणाऱ्या पैशांची सध्या चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या;
मोदी सरकारची मोठी घोषणा! आता कृषी कर्जावरील व्याजात मिळणार मोठी सूट
Farming Technique: आता करा जमिनीखाली आणि जमिनीवर दुहेरी शेती, ही पद्धत अवलंबल्यास मिळेल बक्कळ पैसा..
पन्नास खोके एकदम ओक्के! अधिवेशनात विरोधकांच्या घोषणेची राज्यात चर्चा..
Published on: 19 August 2022, 09:34 IST