News

मुंबई: शिंदे गट आणि फडणवीस (devendra fadnavis) यांनी मिळून सरकार स्थापन केले. मंत्रिमंडळ विस्तार होऊनही महिनाभराचा कालावधी लोटलाय. काल सोमवार मंत्रीमंडळ बैठक पार पडली.

Updated on 13 September, 2022 12:23 PM IST

मुंबई: शिंदे गट आणि फडणवीस (devendra fadnavis) यांनी मिळून सरकार स्थापन केले. मंत्रिमंडळ विस्तार होऊनही महिनाभराचा कालावधी लोटलाय. काल सोमवार मंत्रीमंडळ बैठक पार पडली.

लोकप्रियतेसाठी काही मंत्र्यांनी परस्पर काही योजनांबद्दल नव्याने घोषणा केल्या. अशा उतावीळ मंत्र्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत खडे बोल सुनावले तर काही मंत्र्यांना रोखठोक शब्दात झापले.

कृषी विद्यापीठाकडून नवीन ट्रॅक्टरचलित यंत्र लॉन्च; अशाप्रकारे करा उसातील आंतरमशागत

काल सोमवार मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केंद्राची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना (PM Samman Scheme) राज्यातही नवीन सन्मान योजना राबवावी किंवा केंद्रातील योजनेत राज्याचा काही वाटा समाविष्ठ करून शेतकऱ्यांना मदत योजना सुरू करण्यासंदर्भात विचारमंथन सुरू होते. यासंदर्भातील माहिती बातमी प्रसारमाध्यमांमध्ये लिक झाली.

आनंदाची बातमी! आता गॅस सिलिंडर मिळणार फक्त 750 रुपयांमध्ये; आजच करा बुकिंग

ही गोष्ट फडणवीसांना समजली असता, त्यावरुन मंत्रीमंडळ बैठकीतच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरलं. आणि ही माहिती फोडल्याबद्दल जाब विचारला. अजून कोणताही निर्णय झाला नसताना ही माहिती तुम्ही जाहीर कशी केली? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. असल्याची माहिती समोर आली.

नितीन गडकरींनी शेतकऱ्यांना दिला मोलाचा सल्ला; म्हणाले...

English Summary: Fadnavis stressed on Agriculture Minister Sattar in Cabinet meeting
Published on: 13 September 2022, 12:23 IST