News

काल राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये अनेकांची वर्णी लागली तर अनेकांच्या पदरी निराशा आली आहे. यामध्ये शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 अशा एकूण 18 मंत्र्यांचा शपथविधी (Oath Ceremony) पार पडला. खातेवाटपात भाजपला महत्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

Updated on 10 August, 2022 9:25 AM IST

काल राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये अनेकांची वर्णी लागली तर अनेकांच्या पदरी निराशा आली आहे. यामध्ये शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 अशा एकूण 18 मंत्र्यांचा शपथविधी (Oath Ceremony) पार पडला. खातेवाटपात भाजपला महत्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नगरविकास, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, गृह, अर्थ, राधाकृष्ण विखे पाटील महसूल, चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम, सुधीर मुनगंटीवार ऊर्जा वन, मंगलप्रभात लोढा विधी व न्याय, रविंद्र चव्हाण – गृहनिर्माण, उदय सामंत – उद्योग, दीपक केसरकर – पर्यावरण, पर्यटन, सुरेश खाडे – सामाजिक न्याय हे खाते देण्यात आले आहे.

तसेच दादा भुसे – कृषी, गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा, गिरीश महाजन – जलसंपदा, विजयकुमार गावित – आदिवासी विकास, अब्दुल सत्तार–अल्पसंख्याक विकास, अतुल सावे – आरोग्य, तानाजी सावंत – उच्च व तंत्रशिक्षण, संजय राठोड – ग्रामविकास शंभुराज देसाई – उत्पादन शुल्क संदीपान भुमरे – रोजगार हमी अशी मंत्रीपदे देण्यात आली आहेत.

ब्रेकिंग! बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीशकुमार सरकार पडले, भाजपच्या 16 मंत्र्यांचा राजीनामा

दरम्यान, राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपिनियतेची शपथ दिली. मंगळवारी सकाळी शपथविधी पार पडल्यानंतर खातेवाटपही जाहीर करण्यात आले आहे. यामुळे कोणाला कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

महत्वाच्या बातम्या;
आता शिंदे गटातील नाराज १२ आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात? पुन्हा तेच तिकीट आणि तोच तमाशा...
कस होणार महाराष्ट्राचं? नव्या मंत्रिमंडळात ५ मंत्री बारावी आणि १ मंत्री दहावी पास, बाकीचे...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

English Summary: Fadnavis schooled giving Chief Ministership Shinde group important accounts BJP
Published on: 10 August 2022, 09:25 IST