नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर एका मागे एक संकटांचा पाऊस च पडत आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे आधीच खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे आणि त्यात आता नगदी पीक म्हणून जे केळी चे पीक घेतले जाते त्या केळावर सध्या करपा रोगाचा प्रादुर्भाव पडलेला आहे त्यामुळे केळी चे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने देळूब बुद्रुक मधील एका शेतकऱ्याला हे नुकसान सहन झाले नसल्याने त्याने लावलेली दीड हजार केळीची झाडे उभी कापून टाकलेली आहेत.
काढणीस आलेल्या केळीच्या बागा होत आहेत उध्वस्त:-
अर्धापुर तालुक्यातील सर्व भागात जे केळी चे पीक काढणीस आले होते त्या केळी च्या बागा पूर्णपणे उध्वस्त झालेल्या आहेत तर राहिलेल्या ज्या केळी आहेत.त्या केळी ला बाजारात कसलाच भाव नाही त्यामुळे अर्धापुर तालुक्यातील देळुब येथील युवा शेतकरी शैलेश लोमटे यांनी आपल्या दीड एकर शेतात जी केळी चे बाग लावलेली आहे त्यावर कोयता फिरवलेला आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता सरकारच्या आर्थिक मदतीची गरज भासलेली आहे परंतु सरकार त्यांना मदत करेल का? असा प्रश्न आता शेतकरी वर्गासमोर पडलेला आहे.
हेही वाचा:या योजनेअंतर्गत बळीराजाला मिळणार 40,000 रुपये जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ
सरकारकडून मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी:-
अर्धापुर तालुक्यातील देळुब गावातील शेतकरी शैलेश लोमटे सांगतात की माझ्या शेतात जी केळीची दीड हजार झाडे लावली आहेत त्यास आतापर्यंत जवळपास एक लाख रुपयांचा खर्च आलेला आहे जे की यामधून शैलेश यांना तीन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र केळीवर आता करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने एका झटक्यात सर्व पीक नष्ट झालेले आहे तर जे राहिलेले आहे त्यास बाजारात कसलाच भाव मिळत नसल्याने त्यांच्या शेतात असणारी दीड हजार केळी ची झाडे कापून टाकलेली आहे.त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे
सरकारने लवकरात लवकर आम्हाला मदत करावी अशी मागणी शैलेश लोमटे या शेतकऱ्याची आहे.अर्धापुर, नांदेड, मुदखेड आणि बोकर या तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात केळी चे नुकसान झालेले आहे जे की सध्या केळी उत्पादक शेतकरी संकटात अडकलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांची आहे.
Published on: 29 September 2021, 11:25 IST