शिवसंग्रामचे प्रमुख नेते आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा 14 ऑगस्ट रोजी पुणे-मुंबई महामार्गावर पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. बीडवरून मुंबईला ते मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) महत्वाच्या बैठकीसाठी जात होते.
विनायक मेटे यांच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवसंग्राम पक्षाच्या एका कार्यकर्त्यांने एक मोठा खुलासा केला आहे, ३ ऑगस्ट दिवशी देखील मेटेंच्या गाडीचा पाठलाग झाला असल्याचा दावा विनायक मेटेंचे सहकारी अण्णासाहेब मायकर (Annasaheb Maikar) यांनी केला आहे.
अण्णासाहेब मायकर म्हणाले
“आम्ही 3 ऑगस्टला मुंबईकडे जात असताना शिक्रापूरपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत दोन गाड्यांनी पाठलाग करत होत्या, आयशर ट्रक आणि एर्टिगा या दोन गाड्या आमच्या गाडीच्या मागे पुढे करत होत्या, ही गोष्ट मी मेटे साहेबांच्या निदर्शनास आणून दिली मात्र ड्रायव्हर दारू पिला असेल असं मेटे साहेब यावेळी म्हणाले”.
Diabetes Solution: मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी गुळवेलसह या पानांचा वापर करा; होईल फायदा
यामुळे विनायक मेटे यांता मृत्यू घात की अपघात असा प्रश्न राज्यभरातून उपस्थित केला जात आहे. यामुळे या प्रकरणात आता पुढे काय माहिती समोर येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
खरीप हंगामातील पिकांवर किडींचा प्रादुर्भाव; वेळीच करा कीड व्यवस्थापन, अन्यथा होईल मोठे नुकसान
Animal Husbandry: जनावरांमध्ये कॅल्शिअमची कमतरता आहे? तर वेळीच लक्षणे ओळखून करा उपचार
Castor Farming: एरंडेल शेतीतून लाखोंची कमाई घेण्यासाठी 'या' खास पद्धतीचा अवलंब करा; जाणून घ्या
Published on: 16 August 2022, 11:57 IST