मुंबईत राष्ट्रीय सहनिर्मिती पुरस्कार 2022 वितरण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, देशातील साखरेचं अतिउत्पादन (Sugar Production) ही अर्थव्यवस्थेसाठी समस्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.ऊर्जा क्षेत्राला पूरक ठरणारी कृषी उत्पादने घ्यायला हवीत, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, आपण पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीसाठी दरवर्षी 15 लाख कोटी रुपये खर्च करतो. यामुळे कृषी क्षेत्रामध्ये विविधता आणण्याची गरज आहे. आपली 65 ते 70 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. आपला कृषी विकासदर केवळ 12 ते 13 टक्के आहे. ऊस उद्योग आणि शेतकरी हे आपल्या उद्योगवाढीचे इंजिन आहेत.
यावर्षी आमची साखरेची गरज 280 लाख टन असताना, उत्पादन 360 लाख टनांपेक्षा जास्त आहे. ब्राझीलमधील परिस्थिती पहाता या अतिरिक्त उत्पादनाचा उपयोग केला जाऊ शकतो. मात्र, इथेनॉलची गरज खूप जास्त असल्यानं आपल्याला साखरेपेक्षा इथेनॉल उत्पादनावर भर द्यावा लागेल. उद्योगाने साखरेचं उत्पादन कमी केले पाहिजे. जास्तीत जास्त सहउत्पादनं, उपउत्पादनं घेतली पाहिजेत.
कारखाने कसे विकत घेतले? आयकरची धाड पडलेल्या अभिजित पाटलांनी केला मोठा खुलासा
भविष्यातील तंत्रज्ञानाची दृष्टी आत्मसात केली पाहिजे. वर्षी इथेनॉल निर्मितीची क्षमता 400 कोटी लिटर इतकी होती. इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही खूप उपाय केले आहेत. यामुळे साखरेचं उत्पादन कमी करा, ऊर्जा क्षेत्राला पूरक ठरणारी शेती करा, असे गडकरी यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! पुरंदरमध्येच होणार विमानतळ, शिंदे- फडणवीस सरकारने दिले महत्त्वाचे निर्देश
मोठी बातमी! दूध संघावर एकनाथ खडसे यांचे वर्चस्व, महाजन गटाला मोठा धक्का..
LED bulb; वीज गेल्यावर ४ तास लाइटिंग बॅकअप देतो 'हा' LED ब्लब, किंमत फक्त..
Published on: 30 August 2022, 01:41 IST