स्मार्ट सिटी जर शहराबाहेर साकारली जाणार असेल तर तीनशे चारशे एकर जमीन ताब्यात घेतली जाईल. त्यासाठी किती किंमत दिली जाईल ? कुणाकुणाचा लाभ होईल ? किती जंगल नष्ट होईल, टेकड्या उध्वस्त होतील. वन्यपशुंचे मुळ आश्रय स्थान नष्ट होऊन ते स्थलांतरित होतील. कसेतरी तग धरून असलेल्या वनांचा नाश होईल. जमिनींचे अवास्तव सौदे होतील.
बाधकाम करणाऱ्या कंपन्या, ठेकेदार, बांधकाम साहित्याचे व्यापारी यांची पळापळ सुरु होऊन संबंधित सरकारी अधिकारी, नेतेमंडळी, समाजावर दबाव ठेऊन असणारे बाहुबली सर्वजण सक्रीय होतील. प्रत्येक साध्या साध्या गोष्टींसाठी फिल्डिंग लावली जाईल. अब्जावधी रुपयांसाठी रस्सीखेच सुरु होईल. कोणतीही योजना साकारतांना लोकशाही प्रणालीतील अनेक अडथळे, धोके पार करून ही प्रस्तावित सिटी साकारली तर तिथे राहायला कोण जाऊ शकेल? तिथे काय भाव असेल? कोणत्याही मार्गाने धनाढ्य, अब्जाधीश झालेल्यांनाच फक्त स्मार्ट सिटीत जागा घेणे शक्य होणार आहे .
असे असताना मात्र स्मार्ट सिटी टॅक्स सर्व शहरवासीयांना भरावा लागेल. सामान्य नागरिक मध्यमवर्गीय यांचे स्मार्ट सिटीत काय स्थान असणार आहे? समाजातील गरीब घटक, शेतकरी यांच्यासाठी हा विषय नाहीच, कारण निवडणुकांसाठी अजून वेळ आहे. स्मार्ट सिटी उभारण्यात लागणारा पैसा हा म.न.पा. राज्य शासन व केंद्र शासनाचा आहे. म्हणजेच पर्यायाने प्रत्येक भारतीय नागरिकाचा आहे .
त्यामुळे या योजनेद्वारे आजचे आपले शहर स्मार्ट सिटीत रुपांतरीत व्हावे असे वाटणे गैर नाहीच .या अनुदानाचा वापर करून आजचे आपले शहर दर्जेदार व्हावे हि शहरवासीयांची अपेक्षा आहे, मागणी आहे.
या गावातील प्रत्येक शेतकरी करोडपती, प्रत्येकाकडे आलिशान घर महागडी वाहने, एका पिकाने बदलले नशीब
आपले शहर दर्जेदार स्मार्ट होणे म्हणजेच
*संपूर्ण शहरातील रस्ते road normsप्रमाणे बनवून योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर्स ,रंगीत पट्टे ,झेब्रा क्रॉसिंग व्हावे. रस्ते स्मार्ट तरच सिटी स्मार्ट
* शहर १००% स्वच्छ असावे. कचरा व्यवस्थापन अत्याधुनिक असावे.
* सर्व प्रकारचे प्रदूषण मुक्त शहर.
* २४ तास वीज उपलब्धी.
* २४ तास पाणी उपलब्ध व्हावे.
* भुयारी गटार योजना कार्यान्वित होऊन कुठेही उघड्या नाल्या / नाले नकोत .
*अद्ययावत वाहतूक व्यवस्था व्हावी .आवश्यक तेथे सब-वे, उड्डाण पुलाचे निर्माण होऊन रहदारी नियंत्रित राहावी.
*मोकाट जनावरांना संपूर्ण प्रतिबंध हवा.
*सर्व रोगांची चिकित्सा ,उपचार होर्इल असे सुपर स्पेशिअलिटी हॉस्पिटल व्हावे .
*शहराच्या प्रत्येक सेक्टर [विभाग] साठी वेगळा मार्केट झोन असावा .
*सौर उर्जेचा वापर अनिवार्य करावा .
*वाटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य करावी .
या अशा शहराच्या अनेक सुविधा आहेत.
पेरू लागवडीतून लाखोंचे उत्पादन, युवा शेतकऱ्याचा खडकाळ जमिनीमध्ये अभिनव प्रयोग..
गगनचुंबी इमारती एवढाच स्मार्ट सिटीचा मापदंड नसून आपले शहर स्वच्छ ,स्वस्थ –आरोग्य संपन्न नागरिक असलेले आणि सर्व दृष्टीने सुरक्षित
शहर असावे हीच आपली सर्वांची अपेक्षा आहे .हे सर्व मापदंड पळून प्रत्येक गांव स्मार्ट होण्याची गरज आहे.लेख संग्रह: - घे उंच भरारी (२०१६)
लेखक: - सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती ४४४६०६
मोबा: 9405349354
महत्वाच्या बातम्या;
IYoM 2023: कृषी जागरणमध्ये बाजरीवरील भव्य कार्यक्रमाचे आयोजन, केंद्रीय मंत्री रुपाला यांच्यासह अनेकांची हजेरी
'शेतकऱ्यांनो देशात हुकूमशाहाने जन्म घेतलाय आत्महत्या नको संघटिक व्हा'
वघडच झालं! पैसे परत द्या नाहीतर देवावर हात ठेऊन शपथ घ्या, निवडणुकीत पराभव झालेल्या महिलेचा मतदारांना दम..
Published on: 13 January 2023, 01:38 IST