यावर्षी महाबीज कडून सांगली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम आखण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना सोयाबीनचे के डी एस 726 या सोयाबीनच्या जातीचे बियाणे देण्यात आले होते.
परंतु शेतकर्यांना देण्यात आलेले बियाणे सदोष असल्यामुळे अशा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परिणामी उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट आली. सदर प्रकरणाविरोधी धनगाव येथील शेतकऱ्यांनी आवाज उठवला होता. या दरम्यान कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी या सोयाबीन पिकांची पाहणी करून या संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस कृषी विभाग, महाबीज चे सर्व अधिकारी तसेच धनगाव (तालुका पलूस ) येथील शेतकरी उपस्थित होते.
याप्रसंगी मुदत संपून देखील परिपक्व न झालेल्या सांगली जिल्ह्यासह राज्यातील उन्हाळी सोयाबीन बियाणे प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येईल व त्या अनुषंगाने मदत देऊ असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिली. त्यासोबतच शेतकऱ्यांनी पेरलेल्या या के डी एस 726 जातीच्या वानामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. त्या सगळ्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना केली जाईल.
हे स्थापन केलेली चौकशी समिती या गोष्टीचा अभ्यास करून शासनाकडे त्यासंबंधीचा अहवाल सादर करेल व त्यानंतर शेतकऱ्यांना मदतीबाबत दिलासा देण्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
Published on: 12 May 2022, 10:28 IST