News

वीज पुरवठयात अचानक कपात झाल्यामुळे राज्यात 1400 ते 1500 मेगावॉट विजेचे भारनियमन सुरू करण्यात आले असून राज्यातील जनतेने वीज जपून वापरावी असे आवाहन उर्जामंत्र्यांनी केले आहे. राज्यातील वीज उपलब्धतेची सद्यस्थिती पाहता भारनियमन कधीपर्यंत असेल, हे सांगता येणार नसल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

Updated on 22 April, 2022 12:18 PM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात लोडशेडिंगमुळे अनेकजण वैतागले आहेत. कोळसा आणि वीज टंचाईमुळे राज्यात वीज टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. या बैठकीनंतर नितीन राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

अदानी कंपनीकडून होणाऱ्या वीज पुरवठयात अचानक कपात झाल्यामुळे राज्यात 1400 ते 1500 मेगावॉट विजेचे भारनियमन सुरू करण्यात आले असून राज्यातील जनतेने वीज जपून वापरावी असे आवाहन उर्जामंत्र्यांनी केले आहे. राज्यातील वीज उपलब्धतेची सद्यस्थिती पाहता भारनियमन कधीपर्यंत असेल, हे सांगता येणार नसल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

यामुळे पुढील काही दिवस तरी परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. 58 टक्के पेक्षा अधिक वीज गळती असलेल्या तसेच वीज बिलांची थकबाकी अधिक असलेल्या G1, G2 आणि G3 भागात, तसेच ज्या भागात विजेची चोरी होते त्या भागात चार ते पाच तासापर्यंतचे भारनियमन करण्यात येणार आहे. यामुळे आता उन्हाळ्यात याचा मोठा त्रास होण्याची शक्यता आहे.

तसेच हे भारनियमन 1400 ते 1500 मेगावॉटचे असणार आहे. वीज भारनियमन एकट्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात आहे. केंद्र सरकारचे कोळशाचे नियोजन फसले आहे. शिवाय कोळसा मंत्रालयाला रेल्वे मंत्रालयाचे सहकार्य नाही. त्यामुळे भाजपने खुशाल केंद्र सरकारविरोधात आंदोलन करावे, असे ऊर्जामंत्री राऊत यांनी म्हटले आहे.

यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बाचाबाची सुरु आहे. तसेच शेतकऱ्यांना देखील वीज पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने शेतकऱ्यांचे देखील आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी शेतकरी आणि सर्वसामान्य लोक करत आहेत.

महत्वाच्या बातम्या;
आता झोपो आंदोलन!! महावितरण विरोधात आता शेतकरी आक्रमक
कृषीत येणार महिलाराज! कृषी क्षेत्रातील 50 टक्के योजना या महिला शेतकऱ्यांसाठी असणार राखीव
बैलगाडा शर्यतींचा थरार! नगर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यत राळेगण थेरपाळला भरणार

English Summary: Energy Minister announcement regarding load shedding hours of load shedding in which area ...
Published on: 22 April 2022, 12:18 IST