News

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने त्यांच्या विभागाच्या उद्योजकता योजना आणि इतर फायदेशीर पथदर्शी कार्यक्रमांबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी 'शेतकरी भागीदारी प्राधान्य आमची मोहीम' चा भाग म्हणून एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन २५ एप्रिल पासून २८ एप्रिल पर्यंत करण्यात आले होते.

Updated on 29 April, 2022 12:34 PM IST

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने त्यांच्या विभागाच्या उद्योजकता योजना आणि इतर फायदेशीर पथदर्शी कार्यक्रमांबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी 'शेतकरी भागीदारी प्राधान्य आमची मोहीम' चा भाग म्हणून एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सामायिक सेवा केंद्रांच्या माध्यमातून देशभरात  गावपातळीवर ८००० शिबिरे घेऊन ही जनजागृती करण्यात आली आहे. हा उपक्रम २५ एप्रिलपासून सुरू झाला आणि २८ एप्रिल २०२२  पर्यंत राबविण्यात आला.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री संजीवकुमार बालियान यांनी एका शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आता सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान आणि राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनांना पुन्हा जोडले आहे आणि ब्रीडर फार्म हा त्याचा घटक बनला आहे, असे ते म्हणाले. शिबिरात ईशान्य भारत, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील एक लाखाहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.

राष्ट्रीय पशुधन अभियान ग्रामीण उद्योजक निर्माण करण्यात मदत करेल आणि खेड्यातील बेरोजगार तरुणांसाठी उपजीविकेच्या चांगल्या संधी निर्माण करेल. ते म्हणाले की, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मेंढी, शेळीपालन, डुक्कर पालन, चारा या सर्व क्षेत्रांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देऊन स्वावलंबी भारत निर्माण करण्यास मदत होईल.

त्यांनी अत्याधुनिक प्रजनन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देत तळागाळापर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना केली. बालियान यांनी शेतकऱ्यांना कृत्रिम रेतन आणि सायलेज म्हणजेच सुरक्षित हिरवा चारा उत्पादन पद्धतींना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन विभागाचे सचिव जतींद्र नाथ स्वेन यांनी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि मत्स्यव्यवसाय आणि जलीय पायाभूत सुविधा विकास निधीची माहिती दिली. मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथदर्शी योजनांचा देशभरातील मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायिकांना लाभ घेता येईल, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
मंत्रिमंडळ निर्णय! भारतातील पहिला महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प निर्माण करण्याचा निर्णय
महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय! डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौरऊर्जा कुंपण करण्यासाठी दिले जाणार अनुदान

English Summary: Emphasis on state-of-the-art animal breeding technology from Union Minister of State for Animal Husbandry
Published on: 29 April 2022, 12:27 IST