News

राज्यातील शेतकऱ्यांनी ग्रामसभेला हजर राहून कृषी पंपाना दिवसा दहा तास वीज व शेतीमालाला किमान हमीभाव द्यावा असे ठराव मंजूर करून घेण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे केले आहे.

Updated on 02 May, 2022 6:02 PM IST

राज्यातील शेतकऱ्यांनी ग्रामसभेला हजर राहून कृषी पंपाना दिवसा दहा तास वीज व शेतीमालाला (Agricultural commodities) किमान हमीभाव (Guarantee) द्यावा असे ठराव मंजूर करून घेण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) केले आहे. शिवाय हे मंजूर ठराव स्वाभिमानी संघटनेकडे इमेलद्वारे पाठ्वण्यास सांगितले आहेत.

कोल्हापूर, सातारा, सांगलीसह पुण्यात (Kolhapur, Satara, Sangli and Pune) देखील स्वभमानी शेतकरी संघटनेचे कार्य जोमात सुरु आहे. याच धर्तीवर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी ग्रामसभेला ठरवा मंजूर करण्याचे आवाहन केले.

राजू शेट्टींचा शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यावर जोरदार घणाघात, म्हणाले...

शेतकरी वगळता इतर घटकांना २४ तास वीज पुरवठा केला जातो. मात्र सर्वांसाठी अन्न पिकवणाऱ्या शेतकर्‍यांना बहुतांश रात्रीच्या वेळी शेतीसाठी केवळ आठ तास वीज पुरवठा केला जातो. हा शेतकर्‍यांवर होत असलेला अन्याय मुलभुत अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ((Swabhimani Shetkari Sanghatana)) कायकर्ते व्यक्त करत आहेत. तर हे मुलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन होत असून सद्यस्थितीत शेतकर्‍यांना दिवसा आठ ते दहा तास काम करुन पुन्हा रात्रीचे वेळी शेताला पाणी देण्याचे काम भयावह आहे.

ठरलं तर! पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता 'या' तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार

रात्रीच्या वेळी जंगली प्राणी, साप, हिंस्त्र श्वापदे अन्नाच्या शोधासाठी बाहेर पडतात. त्यामुळे प्राण्यांच्या हल्ल्यात आत्तापर्यंत हजारो शेतकर्‍यांचा बळी गेलेला आहे. शिवाय शेतमालास कायदयाने मंजूर हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये कोणालाही शेतकर्‍यांच्या मालाची खरेदी करता येणार नसल्याचा कायदा सरकारने मंजुर करुन लागू करावा.

हे दोन ठराव मंजूर होण्यासाठी ग्रामसभेत शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन स्वाभिमानी संघटनेने केले आहे. तर याबाबत अधिक माहितीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, मध्यवर्ती कार्यालय, जयसिंगपूर (ता. शिरोळ जि. कोल्हापूर) यांच्या दूरध्वनी क्रमांक संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
आनंदाची बातमी : आमिर खान यांनी 'सत्यमेव जयते फार्मर कप' ची केली घोषणा; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी आता कृषी यंत्रावर मिळणार अनुदान

English Summary: electricity to agricultural pumps and agricultural commodities during the day
Published on: 02 May 2022, 06:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)