News

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या वीज तोडणी अभियानाची सर्वत्र चर्चा बघायला मिळत होती. महावितरण कडून थकबाकी असलेल्या शेतात पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केला जात होता. यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होत होते. रब्बी हंगामातील पिके ऐन बहरात असताना महावितरणची ही कारवाई पिकांसाठी घातक सिद्ध होतं होती.

Updated on 17 March, 2022 12:18 PM IST

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या वीज तोडणी अभियानाची सर्वत्र चर्चा बघायला मिळत होती. महावितरण कडून थकबाकी असलेल्या शेतात पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केला जात होता. यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होत होते. रब्बी हंगामातील पिके ऐन बहरात असताना महावितरणची ही कारवाई पिकांसाठी घातक सिद्ध होतं होती.

त्यामुळे राज्यात सरकार विरोधात तसेच महावितरणच्या विरोधात मोठा रोज बघायला मिळाला वीज तोडणी तात्काळ थांबवण्यासाठी शेतकरी बांधवांनी तसेच अनेक शेतकरी संघटनांनी (Farmer Organization) तीव्र निषेध व्यक्त केला.

अनेक ठिकाणी उग्र आंदोलन देखील या वेळी बघायला मिळाले. यासोबतच विरोधी पक्षाने देखील हा मुद्दा चांगलाच रेटला यामुळेच वीजतोडणी तात्काळ बंद करून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतः दिले. आदेश हा थेट मुंबईवरून आला असल्याने स्थानिक पातळीवर लगेचचं याची अंमलबजावणी बघायला मिळत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, एकट्या नांदेड जिल्ह्यात (Nanded District) एकाच दिवसात 1600 रोहित्रांना जीवनदान देण्यात आले अर्थात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. शासनाच्या (Udhhav Thackeray) या निर्णयामुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आला मात्र रब्बी हंगामातील पिके यामुळे बहरतील का? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेतकरी बांधव मायबाप सरकार निर्णय घेण्यास खूपच उशिरा झाले असल्याचे सांगत आहेत.

शेतकऱ्यांची अवस्था सध्या मोठी बिकट आहे आणि उन्हाचे चटके वाढू लागल्याने रब्बी हंगामातील पिकांना देखील पाण्याची नितांत आवश्यकता आहे यामुळेच खंडित केलेला विद्युत पुरवठा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला.

मात्र, वीज तोडणीला फक्त तीन महिने स्थगिती देण्यात आली आहे त्यानंतर पुन्हा थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडणी सुरु केली जाईल, म्हणजेच कृषी पंपाच्या थकबाकीतुन शेतकऱ्यांची सुटका होणार नाही. या तीन महिन्यात थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही तर पुन्हा तीन महिन्यानंतर कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केला जाईल.

यामुळे शेतकरी बांधवांनी या तीन महिन्यात वीजबिल भरणा करावा असे महावितरणकडून सांगितले गेले आहे. मित्रांनो नांदेड जिल्ह्यात महावितरणकडून सुमारे 1700 डीपी बंद करण्यात आल्या होत्या, शासनाचा निर्णय प्राप्त झाल्या बरोबर एका दिवसात या 1700 पैकी 1600 डीपी सुरु करण्यात आल्या आहेत.

शासनाचा निर्णय आणि महावितरणची अंमलबजावणी ही जरी कौतुकास्पद असली तरी यामुळे रब्बी हंगामातील पिके पुन्हा एकदा बहरतील का असा सवाल उभा झाला आहे. शेतकऱ्यांच्या मते पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके चांगली बहरत आहेत. खरीप हंगामात झालेल्या जास्तीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांकडे पाण्याचा मुबलक साठा आहे.

परंतु मध्यंतरी दाणे भरण्याच्या ऐन नाजूक वक्ताला महावितरण विद्युत पुरवठा खंडित केला, यामुळे अनेक भागातील रब्बी हंगामातील पिकांना 2 पाणी फिरवले गेले नाहीत साहजिकच यामुळे विपरीत परिणाम झाला आणि याचा थोडा उत्पादनावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे शासनाचा हा निर्णय जरी कौतुकास्पद असला तरी देखील निर्णय घेण्यास शासनाने विलंब केल्या असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.

हेही वाचा:-महत्वाची बातमी! कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार; उपमुख्यमंत्री अजित दादांनी केले स्पष्ट

हेही वाचा:-अरे देवा! कारखान्याजवळील उसाच्या फडातचं उसाला आले तुरे; उस उत्पादक शेतकरी चिंतेत

हेही वाचा:-मोठी बातमी! 'या' कारणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे होणार चांगभलं; बांधावरच मिळणार खरेदीदार

English Summary: electricity start again but rabbi crop this is the main question
Published on: 17 March 2022, 12:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)