गेल्या काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर करण्यात आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणूकीस पात्र समित्यांबाबत हा निर्णय घेतला आहे. यामध्ये २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे.
याबाबतची प्रक्रिया बुधवार ७ सप्टेंबर पासून सुरू होत असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे. यामुळे इच्छुकांनी आता मोर्चे बांधणी केली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी व मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.
दरम्यान, कृषी पत संस्थांच्या निवडणूकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका सुरु करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर १३ याचिका दाखल झाल्या होत्या. उच्च न्यायालयाने निवडणूकीस पात्र विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूका पूर्ण करुन त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका पूर्ण करण्याबाबत १८ नोव्हेंबर २०२१ रोजी आदेश दिले.
शेतकऱ्यांनी दाखवला पीक विमा कंपनीला हिसका! पीक विमा भरपाई देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, बाजार क्षेत्रातील परवाना धारक व्यापारी, आडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार असल्यामुळे या मतदारांची यादी १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित बाजार समित्यांना दिलेले आहेत.
यामुळे ही प्रक्रिया आता लवकर पार पडेल. आता यासाठी प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर रोजी आणि अंतिम मतदार यादी ७ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
... तर दंड भरावाच लागणार! सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर गडकरींचा मोठा निर्णय
पाकिस्तानमध्ये टोमॅटो 500 रुपये किलो, निर्यात करून शेतकऱ्यांना दिलासा द्या, पंतप्रधानांना पत्र
अपात्र असल्याचे सांगून देखील मोदींचे २ हजार रुपये राजू शेट्टी यांच्या खात्यावर, शेट्टी म्हणाले, गौडबंगाल आहे..
Published on: 07 September 2022, 12:05 IST