News

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य लोकांसाठी नवनवीन योजना (New plans) राबवत असते, ज्यामधून सर्वसामान्यांना आर्थिक लाभ मिळतो. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक जिल्हा एक उत्पादनासाठी नियोजन करण्यास निर्देश दिले आहेत.

Updated on 02 August, 2022 3:40 PM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य लोकांसाठी नवनवीन योजना (New plans) राबवत असते, ज्यामधून सर्वसामान्यांना आर्थिक लाभ मिळतो. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक जिल्हा एक उत्पादनासाठी नियोजन करण्यास निर्देश दिले आहेत.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्या हा विशिष्ट उत्पादनासाठी ओळखला जावा तसेच जिल्ह्याचा ब्रॅंड (brand) व्हावा, निर्यात करणे तसेच बाजारपेठ उपलब्ध करणे यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत.

राज्यात राबवण्यात येणाऱ्या केंद्राच्या योजना किती प्रमाणात लाभार्थ्यांपर्यंत पोहचल्या आहेत, याचा आढावा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Chief Minister Shinde and Deputy Chief Minister Fadnavis) यांनी सोमवारी घेतला. यावेळी त्यांनी जलजीवन मिशनसह (Aquatic Missions) अन्य योजनांचा आढावा देखील घेण्यात आला.

हे ही वाचा 
Ration Card Holders: रेशन कार्ड धारकांना मोठा धक्का; मोफत धान्य सुविधा बंद होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

"नव्या सरकारकडून प्रधानमंत्र्यांनी देखील मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीस गेलो असता त्यांनी केंद्र राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली असून अंमलबजावणीत कोणत्याही स्वरूपाच्या अडचणी आल्या तरी आपण त्या दूर करू, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

''पंतप्रधान मस्त्यसंपदा योजनेची अंमलबजावणी दक्षिण भारत व गुजरातमध्ये चांगल्या प्रकारे झाली आहे. त्याचप्रमाणे आयआयटीमधील कौशल्य विकासासंदर्भात कर्नाटकातही चांगले काम झालेले आहे. याठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांची पथके पाठवून अभ्यास करावा. तसेच गोबर धन बायो सीएनजी योजना योग्य रीतीने गोशाळा आणि बचत गटांना देखील सहभागी करून घ्यावे", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा 
Crop Production: 'या' पाच पिकांच्या शेतीमधून शेतकरी कमवतोय लाखों रुपये; जाणून घ्या 'या' पिकांविषयी...

कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली?

अमृत सरोवर अर्बन, जलधरोहर संरक्षण, तंत्र आणि वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेमध्ये देण्याकरिता भाषा तज्ज्ञांचे मंडळ स्थापन करणे, जीएसटी अंमलबजावणी, जेम पोर्टलवरील खरेदी, असंघटित कामगारांची नोंदणी, गोबर धन बायो सीएनजी, पीक विकेंद्रीकरण, पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना, राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम, आधार सेवा, क्रीडा उपक्रम तालुक्यांपासून जिल्ह्यांपर्यंत आयोजित करणे, अंगणवाडी दत्तक घेणे अशा विविध विषयांवर चर्चा झाली.

महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! आता 17 व्या वर्षी बनवा मतदान ओळखपत्र, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..
Money Transfer: चुकून दुसरीकडे पैसे ट्रान्सफर झाले तर त्वरित करा 'ही' प्रोसेस; पैसे जमा होतील खात्यात
Fertilizers: शेतकरी मित्रांनो पिकांना खत देताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या; होईल फायदाच फायदा

English Summary: Eknath Shinde Start planning one district product
Published on: 02 August 2022, 03:33 IST