News

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री अशी धक्कादायक घोषणा गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Updated on 30 June, 2022 5:52 PM IST

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री अशी धक्कादायक घोषणा गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

फडणवीस आणि शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याच्या राजकारणाने एक नवीनच यू-टर्न घेतला.

फडणवीस यांनी घोषणा केल्यानंतर "फडणवीसांनी मोठेपणा दाखवला, बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद दिले" असे भावुक प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

नक्की वाचा:प्राथमिक कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण; 13 कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा

गेल्या दहा दिवसांपासून राज्यांमध्ये हा सत्ता संघर्ष पाहायला मिळत होता. परंतु उद्धव ठाकरे यांनी काल बुधवारी सायंकाळी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राजीनामा दिल्यानंतर,

आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी शक्यता सगळ्यांचं थरातून  वर्तवण्यात येत होती. मात्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यामुळे एकच धक्का बसला.

नक्की वाचा:सोन्यासारखे पीक पिकवण्यासाठी शेतकऱ्यांवर सोनं गहाण ठेवण्याची आली वेळ

 त्यानुसार शिंदे आज सायंकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की

2019 च्या निवडणुकीत शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आणि भारतीय जनता पार्टीने एकशे पाच जागा मिळाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी घोषणा केली होती मात्र तेव्हा निकाल आल्यानंतर आमचे मित्र आणि नेत्यांनी शब्द फिरवला.

विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा आजन्म विरोध केला, अशा काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत युती केली. भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवले हा जनमताचा अपमान होता असे देखील फडणवीस म्हणाले.

नक्की वाचा:आता 'डीएपी'बद्दल नो टेन्शन,रशिया बनला सर्वात मोठा खतपुरवठादार

English Summary: eknaath shinde is new chief minister in maharashtra
Published on: 30 June 2022, 05:52 IST