News

ईडीनं आता आपली नजर कोकणातील रिफायनरी भागात होणाऱ्या जमीन व्यवहाराकडे वळवली आहे.

Updated on 26 April, 2022 10:20 AM IST

कोकणातील रिफायनरी प्रकल्प कायमच चर्चेत राहिला असून यावरून भाजप सेनेत अनेकदा वाद पाहायला मिळाले आहेत. त्यातच महाविकास आघाडी नेत्यांची अनेकदा चौकशी करून ईडीने त्यांना सळोपळो करुन सोडलय, ईडी आता थेट कोकणातही पोहोचली आहे.

कारण ईडीनं आता आपली नजर कोकणातील रिफायनरी भागात होणाऱ्या जमीन व्यवहाराकडे वळवली आहे. कोकणातील रिफायनरी प्रकल्प कायमच चर्चेत राहिला असून याच प्रकल्प परिसरात मागील दोन ते चार वर्षात झालेल्या जमीन खरेदीचा व्यवहार ईडीनं मागील काही दिवसांपूर्वी तपासल्याची चर्चा असल्याबाबत बातमी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने काही दिवसापूर्वी प्रसिद्ध केली होती.

मार्चमध्ये महाविकास आघाडीतील एका मोठ्या नेत्याच्या भावाची तसेच त्यांच्या नातेवाईकांची ईडीनं चौकशी केल्याची माहिती माहिती असल्याचेही या बातमीत म्हटले होते. ८ आणि ९ मार्च रोजी राजापूर शहरातील एका हॉटेलमध्ये पहाटे पाच वाजता अंदाजित २०० एकर जागा खरेदीबाबत ईडीने चौकशी केल्याचे वृत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पश्चिम भागात असणारे कोंड्ये गावातील जमीन व्यवहारांची चौकशी ईडीने केल्याचे कळतं आहे.

शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांची आतापर्यंत ईडीने चौकशी केली आहे. अनेक नेत्यांच्या झालेल्या चौकशीवरुन महाविकासआघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून अनेक नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारचा तसेच ईडी चा निषेध केला आहे. राज्यातलं सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकार तसेच महाराष्ट्रातील भाजप ईडीचा करत असल्याचा आरोप वारंवार महाविकासआघाडीकडून केला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी शिवसेना नेत्यांवर पडत आहेत.

राहुल कनाल, यशवंत जाधव तसेच उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावरही केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकली आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने जप्ती आणली आहे. आणि आता ईडी चे लक्ष कोकणातील रिफायनरी भागातील जमीन खरेदी विक्रीवर असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या
गुलखैरा नाव ऐकलं आहे का कधी? ही आहे औषधी वनस्पती, लागवड केली तर मिळू शकतो दुप्पट नफा
Organic Fertilizer : शेणखताची डिमांड वाढली!! एक ट्रकची किंमत ऐकून बसेल शॉक

English Summary: ED: Land purchase transactions in Konkan refinery area are on ED's radar
Published on: 26 April 2022, 10:20 IST