दिल्ली-एनसीआरमध्ये आज दुपारी ३ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. हा भूकंप इतका जोरदार होता की दिल्लीतील लोक घाबरले आणि घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी उभे राहिले. हरियाणामध्ये मंगळवारी दिवसभरात दुसऱ्यांदा भूकंप झाला. पानिपत, रोहतक, जिंद, रेवाडी आणि चंदीगड आदी भागात दुपारी 2.50 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.
त्यामुळे अराजकता निर्माण झाली. लोक घराबाहेर पडले. आज सकाळी सोनीपतमध्ये २.७ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला.नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मंगळवारी सकाळी ११.०६ सेकंदांनी भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू सोनीपत असल्याचे सांगण्यात येत आहे. पृथ्वीच्या 8 किलोमीटर खाली हालचालींची नोंद झाली आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये आज दुपारी साडेतीनच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की कार्यालयात काम करणारे लोक रस्त्यावर आले. अनेक भागात लोक घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. सध्या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. दिल्ली-एनसीआरमध्ये वारंवार भूकंप होतात. दिल्ली-एनसीआर भूकंपीय क्षेत्र-4 मध्ये येते. भूकंपासाठी ते अत्यंत संवेदनशील आहे. दिल्ली-एनसीआर सोहना फॉल्ट लाइन, मथुरा फॉल्ट लाइन आणि दिल्ली-मुरादाबाद फॉल्ट लाइनवर आहे.
शेतकऱ्याचा नाद खुळा! चक्क ऑडीतून केली भाजीची विक्री, पब्लिक बघतच राहिले...
पृथ्वीच्या आत सतत हालचाल असते. त्यामुळेच या परिसरात भूकंपाचे धक्के वारंवार जाणवत आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या म्हणण्यानुसार दिल्लीत सध्या कोणताही मोठा भूकंप होण्याची शक्यता नाही. तज्ज्ञांचे असे मत आहे की, वारंवार होणा-या छोट्या भूकंपांमुळे पृथ्वीच्या आतील उष्णता बाहेर पडते. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता नाही.
नादखुळा जुगाड! अवघ्या 45 हजार रुपयांमध्ये मारुती 800 बनली करोडो रुपयांची रोल्स रॉयल्स..
Published on: 03 October 2023, 03:37 IST