सध्या शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न (Farmers Son Marriage) होत नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाही ही आता एक सामाजिक समस्या झाली आहे.
काही दिवसांपूर्वी शेतकरी मुलांनी लग्न होत नाही, म्हणून वरात काढली होती. यामुळे याची बरीच चर्चा झाली होती. आता शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा मुद्दा आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उचलून धरला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatna) यासाठी लवकरच वरात मोर्चा काढणार आहे.
याबाबत शेतकरी मुलांसोबत लग्न करणाऱ्या मुलीच्या नावावर राज्य सरकारने 10 लाख रुपये आणि मुलीच्या वडिलांच्या नावावर 5 लाख रुपये ठेवण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे.
धक्कादायक! बैलगाडा शर्यतीसाठी गेलेल्या युवकाच्या पोटात बैलाने खुपसले शिंग, तरुणाचा जागीच मृत्यू..
या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर वरात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने राज्यात मोठ्याप्रमाणात मुलं बिनलग्नाची राहिली आहेत.
अजून तीन दिवस पाऊस, गारपिटीचा शक्यता, 'या' ठिकाणी होणार पाऊस, जाणून घ्या..
शेतकरी मुलांचे वय 40 च्या वर गेले तरी देखील त्यांना मुली मिळत नाहीत. यामुळे परिस्थिती बिघडली आहे. बेरोजगारीमुळे त्यांना नोकरी मिळत नाहीये. नोकरी नसल्यामुळे त्यांचे लग्न होत नाही. कर्नाटकमध्ये याबाबत राजकीय नेते आश्वासन देत आहेत.
शेतकऱ्यांनो दुधाळ जनावरांसाठी अधुनिक आहार पद्धती जाणून घ्या, होईल फायदा..
शेतकऱ्यांनो शेत जमीन जाळू नका, जाणून घ्या..
खरिपाचे नियोजन कसे करायचे, शेतकऱ्यांनो जाणून घ्या...
Published on: 15 April 2023, 03:13 IST