News

गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी स्वयंपाक घरातील आवश्यक गोष्टींच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना किमती परवडत नाहीत अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात आवश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.

Updated on 03 October, 2022 11:52 AM IST

गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी स्वयंपाक घरातील (cooking house) आवश्यक गोष्टींच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना किमती परवडत नाहीत अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात आवश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये (prices) पुन्हा वाढ झाली आहे.

यामध्ये गहू, पीठ आणि तांदूळ (Wheat, flour and rice) यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून गव्हाचे दर (Wheat price) वाढले आहेत. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कमी पुरवठा आणि जास्त मागणी असल्यामुळे गव्हाच्या दरात प्रति क्विंटल 2 हजार 560 रुपयांची वाढ झाली आहे.

गहू उत्पादन घटण्याचे कारण म्हणजे यावर्षीची वाढती उष्णता. माहितीनुसार सध्या गव्हाचा भाव 2560 रुपये प्रतिक्विंटल आहे. परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये सणासुदीच्या काळात 2,600 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

भाजीपाला पिकांमधील किटकरोगांचा कायमचा करा नायनाट; जाणून घ्या नियोजन पद्धती

पिठाची किंमत

गहू, पीठ आणि तांदूळ (rice prices) यांच्या सरासरी किरकोळ किमतींमध्ये कल दाखवला आहे. पिठाची सरासरी किरकोळ किंमत 36.13 रुपये प्रति किलो आहे. शुक्रवारी तांदळाची सरासरी किरकोळ किंमत 38.2 रुपये प्रति किलो.

यवतमाळच्या शेतकऱ्याने तयार केली भन्नाट कार; फक्त 150 रुपयात धावणार 250 किलोमीटर

गव्हाच्या दरात वाढ

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गव्हाच्या दरात जवळपास 14 ते 15 टक्के वाढ झाली आहे. पिठाच्या दरात सुमारे 18 ते 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गव्हाच्या किमती (wheat prices) वाढण्यामागे आंतरराष्ट्रीय मागणी-पुरवठ्याची परिस्थिती आणि जागतिक वस्तूंच्या किमती यामुळे वाढ झाली.

महत्वाच्या बातम्या 
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक! गॅस सिलिंडरची किंमत 'इतक्या' रुपयांनी स्वस्त
शेतकऱ्यांनो रद्दीच्या वापराने बियांची करा उगवण; जाणून घ्या 'या' नवीन तंत्रज्ञानाविषयी
मेष, मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस जाणार उत्तम; इतर राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या

English Summary: during festive season Big hike wheat flour rice prices
Published on: 03 October 2022, 11:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)