देशभरात मोदी सरकारच्या अभियानामुळे (Modi government campaign) प्रत्येक घरात तिरंगा फडकत आहे, त्यामुळे देशातील प्रत्येक घर, शाळा आणि कार्यालयांमध्ये तिरंगा फडकताना दिसत आहे. सरकारच्या या अभियानामध्ये कृषी जागरणने देखील भाग घेतला आहे. कृषी जागरणने कार्यालयात पाहुण्यांसोबत तिरंगा "राष्ट्रध्वज" (national flag) फडकवत आहे.
या अभियानानिमित्त कृषी जागरणतर्फे (krishi jagran) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वांनी मिळून कार्यालयाच्या छतावर तिरंगा फडकावला.
आम्ही तुम्हाला सांगतो की कृषी जागरणच्या टीमने (Krishi Jagran team) आज म्हणजेच शनिवार, 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात तिरंगा फडकावला आणि प्रत्येक घरात तिरंगा कार्यक्रम सुरू ठेवला. सोमाणी सीड्सचे व्यवस्थापकीय संचालक के.व्ही.सोमाणी हे देखील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते. ज्यांनी कृषी जागरण टीमसोबत मिळून कार्यालयाच्या छतावर तिरंगा फडकवला.
लिंबाची शेती शेतकऱ्यांना करणार करोडपती! जाणून घ्या खास फॉर्म्युला...
हा क्षण सर्वांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा होता. या कार्यक्रमादरम्यान सर्वांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण झाली. तिरंगा फडकवल्यानंतर सर्वांनी मिळून राष्ट्रगीत गायले आणि स्वातंत्र्याचा नाराही दिला. एम सी डॉमिनिक, संचालक शायनी डॉमिनिक तसेच कृषी जागरणचे सर्व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रमुख पाहुणे के.व्ही.सोमाणी यांचे देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त छोटेखानी भाषण झाले.
अरे व्वा, भारीच की! आता भात शेतीवर रोगाची भीती नाही, वापरा ही खास पद्धत; जाणून घ्या...
दुसरीकडे कृषी जागरणचे संस्थापक आणि मुख्य संपादक एमसी डॉमिनिक यांनीही हा एक संस्मरणीय क्षण असल्याचे या शुभप्रसंगी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
करोडपती बनवणारी शेती! या झाडांची एकदाच लागवड आणि बक्कळ कमाई; जाणून घ्या या शेतीबद्दल...
शेतकऱ्यांनो शेतात करा वेगवेगळ्या पिकांची लागवड! उत्पन्नात होईल भरघोस वाढ; जाणून घ्या...
Published on: 13 August 2022, 04:55 IST