दारू पिऊ नका ती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. असे म्हटले जाते. मात्र ती सरकारच्या दृष्टीने किती महत्वाची आहे हे समोर आलेल्या आकडेवारीवरून दिसून येईल. महाराष्ट्र शासनाने दारू विकून घसघशीत कमाई केली आहे. हा आकडा खूपच मोठा आहे.
दारूच्या विक्रीत एका वर्षात 23% विक्रमी वाढ झाली असून महसुलात 25% वाढ झाली आहे. राज्यात 2021-22 आणि 2022-23 या कालावधीत दारूच्या विक्रीत 23% वाढ झाली आहे. यामुळे ही आकडेवारीच सगळं काही सांगून जात आहे.
किमतीत वाढ होऊनही गेल्या अनेक वर्षात ही सर्वात मोठी वार्षिक वाढ झाली आहे. राज्याला विक्रमी रु. 21,550 कोटी उत्पादन शुल्काचा फायदा झाला, जे महसुलात जवळपास 25% ची मोठी वाढ झाली आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदा सर्वात आधी दारूची दुकाने का उघडली याचा अंदाज येईल.
अतिवृष्टीचा पंचनामा करण्यास नकार, कृषीमंत्र्यांनी थेट निलंबनच केलं..
बिअर आणि वाईन विक्रीला उदारीकरण करण्याच्या राज्याच्या धोरणामुळे, विशेषत नागपूर, कोल्हापूर आणि औरंगाबादमध्ये बिअर आणि वाईनच्या उपलब्धतेत सुधारणा झाली आहे. त्यामुळे विक्रीत आणि महसुलात वाढ होते. यामुळे सरकारचा फायदा होतोय.
अतिवृष्टीचा पंचनामा करण्यास नकार, कृषीमंत्र्यांनी थेट निलंबनच केलं..
यासोबतच राज्याने अखेरीस बिअरवरील कर कमी केल्यास मुंबई-ठाणे, नाशिक आणि पुणे विभागातील विक्रीत मोठी वाढ होईल. यामुळे सरकारकडे जर सर्वात जात कशाचे उत्पन्न येत असेल तर ते दारूमुळे येत आहे.
मे महिना आहे खुपच उष्ण, पशुधनाची घ्या अशी काळजी..
हे झाड बदलणार शेतकऱ्यांचे नशीब! लागवड करा आणि करोडपती व्हा...
पुण्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता! पुढचे चार दिवस महत्वाचे
Published on: 09 May 2023, 01:40 IST