शेतकऱ्यांसाठी सरकार नेहमी नवीन नवीन योजना काढत असते जे की या योजनांमधून शेतकरी वर्गाला चांगला लाभ मिळावा. या योजनांपैकी च सरकारची पीएम किसान मान धन योजना देखील आहे.जसे सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना पेन्शन भेटते तसेच शेतकरी वर्गाला सुद्धा दरमहा पेन्शन भेटते. वयाच्या ६० वर्षानंतर या पेन्शनची तरतूद केली जाते जे या योजनेमध्ये १८ ते ४० वयोगटातील शेतकरी सहभागी होऊ शकतात. या पेन्शन च्या फंडाचे व्यवस्थापन LIC करते.
दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळवा:-
या योजनेमध्ये आपल्या वयानुसार ६० वर्षानंतर मासिक पेन्शन ३००० रुपये वर्षाला ३६००० हजार रुपये दिले जातात मात्र यासाठी ५५ ते २०० रुपये योगदान असावे लागते. आता पर्यंत या योजनेमध्ये २१ लाखांपेक्षा जास्त शेतकरी सहभागी झाले आहेत. तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता मात्र कसा चला तर जाणून घेऊया.
जाणून घ्या ही योजना काय?
या शेतकरी किसान पेन्शन योजनेमध्ये १८ ते ४० वयोगटातील शेतकरी सामील होऊ शकतात, मात्र ज्या व्यक्तीकडे लागवडीसाठी फक्त २ एकर जमीन पाहिजे. तशा व्यक्तींना जवळपास २० वर्ष ते जास्तीत जास्त ४० वर्ष या योजनेअंतर्गत ५५ ते २०० रुपये आपले योगदान द्यावे लागते.शेतकऱ्याच्या योगदानाच्या बरोबरीने त्याला योगदान दिले जाईल. जसे की जर शेतकऱ्याच्या पीएम किसान खात्यात तुमचे योगदान ५५ रुपये असेल तर सरकार तुमच्या खात्यामध्ये ५५ रुपये योगदान देईल.
हेही वाचा:मराठवाडा, कोकण, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार, मुंबईतही दमदार पावसाचा इशारा
याप्रमाणे मोफत नोंदणी करा:-
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी शेतकऱ्याला त्याच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर ला जाऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड, सातबारा प्रत, पासपोर्ट आकाराचे २ फोटो आणि बँकेचे पासबुक असणे आवश्यक आहे. ज्यावेळी नोंदणी होईल त्यावेळी शेतकऱ्याला पेन्शन कार्ड तसेच पेन्शन युनिक नंबर दिला जाईल यासाठी वेगळे पैसे आकारण्यात नाहीत येणार.
तुम्ही याची सुरुवात कमी रुपयांपासून करू शकता:-
तुम्ही जर तुमच्या वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेत सामील झाला तर तुमचे दरमहा ५५ रुपये योगदान असेल तर वर्षाला तुमचे ६६० रुपये योगदान असेल आणि जर तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षी यामध्ये सामील झाला तर तुमचे दरमहा २०० रुपये योगदान अस्सल म्हणजेच वर्षाला २४०० रुपये योगदान असेल.
तुम्हाला मध्येच योजना बंद करायची असेल तर:-
जर तुम्हाला ही योजना मधूनच सोडायची असेल तर पैसे न बुडता तुमच्या खात्यावर जी रक्कम जमा झालेली आहे ती रक्कम बँकेच्या व्याजानुसार तुम्हाला भेटते. जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीस ५० टक्के रक्कम मिळत राहील.
Published on: 30 August 2021, 11:14 IST