Crop Loan : भारतीय अर्थव्यवस्थेत अनन्यसाधारण महत्व असणारं क्षेत्र म्हणजे शेती. आज नाही म्हटलं तरी जवळजवळ ६० ते ७०% लोक ही शेती आणि शेतीच्या निगडित व्यवसायांशी संबंधित असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरवण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. विविध योजनांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
रब्बी आणि खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पैशांची गरज भासते. आणि त्यामुळेच 'पिक कर्ज योजना' राबविण्यात आली आहे. या चालू वर्षात पिक कर्जासाठी 64 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.असं असताना अनेक बँका या उद्दिष्टापासून कोसो दूर आहेत. पीक कर्ज योजनेच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करूनही शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वेळेत पिक कर्जाचे वाटप करण्याची सूचना जारी केली आहे.
दरम्यान, गरज पडल्यास जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन बॅंक मेळावे आयोजित करावे, एक ना अनेक उपक्रम राबवून शेतकऱ्यांना कर्ज मिळाले तरच या योजनांची उद्दिष्ट्ये पूर्ण होतील असे मत बॅंक अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले होते. आता नांदेड जिल्हा प्रशासानाने याची दखल घेत अंमलबजावणी केली आहे. कर्ज वितरणासाठी नांदेड जिल्हा प्रशासानाने एक दिवसीय शिबिराचे आयोजन केले. यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि बचत गटांना बराच फायदा झाला आहे.
आख्ख मार्केट आता आपलंय! उच्च शिक्षण घेऊन देखील पठ्या कंपनीत विकतोय फळे, करतोय लाखोंची कमाई
नांदेड जिल्ह्यात 84 ठिकाणी पार पडले शिबिर
राज्यात 1 मार्चपासून पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. सरकारच्या घोषणेनंतर लगेचच नांदेड जिल्ह्याने त्याची अंमलबजावणी करत एक दिवसाचे शिबीर घेतले असून जिल्ह्यात 84 ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी अर्धापूर तालुक्यातील लिंबगाव, मालेगाव आणि अर्धापूर येथील शिबिरांच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.
पीककर्जाच्या आकड्यात होणार वाढ
ही योजना तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी आणि त्याचा त्यांना लाभ घेता यावा यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. परंतु स्थानिक पातळीवरील यंत्रणा तसेच माहितीचा आभाव यांमुळे शेतकरी यापासून वंचित राहतात. ही बाब सरकारच्या निदर्शणास आल्याने वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून कर्ज वाटप करावे असे निर्देश काढण्यात आले. याची दखल घेत आता पुढील 15 दिवसांमध्ये पीककर्ज वाटपाचा आकडा वाढवणार असल्याचा निर्धार बॅंकांनीही व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Breaking: भारताच्या गव्हात आढळला व्हायरस; 'या' देशाने परत केला भारतीय गहू
मोठी बातमी! कोरोना रुग्ण वाढत चालल्याने मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय
Published on: 02 June 2022, 03:44 IST