News

आता साखर कारखान्यांमधील अंतर 25 किमी वरून 15 किमीवर येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाबाबत तातडीने पाठपुरावा करून शेतकरी हिताचे धोरण राबविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Updated on 01 December, 2022 12:28 PM IST

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दोन टप्यातील एफ. आर पी चा कायदा रद्द करून एक रक्कमी एफ. आर. पी च्या कायद्याची अमलबजावणी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या विविध प्रश्नाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे.

एक रक्कमी एफ. आर. पी चा कायदा राज्य सरकार पुर्ववत करून दोन टप्यातील एफ. आर. पी. चा कायदा रद्द करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत केली. त्याबरोबरच वजनकाटे ॲानलाईन करणे, वाहतूकदारांना महामंडळामार्फत मजूर पुरवठा करणे.

आता साखर कारखान्यांमधील अंतर 25 किमी वरून 15 किमीवर येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाबाबत तातडीने पाठपुरावा करून शेतकरी हिताचे धोरण राबविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

चांगल्या कामाची चुकीची पावती! तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

या बैठकीच्या सुरवातीस राजू शेट्टी यांनी गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला एफ आर पी अधिक 200 रूपये मिळण्यासाठी मागील वर्षाच्या हिशेबाचे ऑडिट ताबडतोब करून घ्यावे. एकरकमी एफ आर पी कायदेशीर मिळण्यासाठी महाविकास आघाडी सरकाने केलेली दोन तुकड्यातील एफ.आर.पी. चा बेकायदेशीर कायदा दुरूस्त करून तो पुन्हा नागपूर अधिवेशनामध्ये एक रकमी एफ आर पी चा कायदा मंजूर करण्यात यावा.

साखर कारखान्यांनी तोडणी वाहतुकीमध्ये भरमसाठ खर्च दाखवलेला आहे. सरकारी ऑडिटर मार्फत ऑडिट करूण्यात यावे आणि जी खरी तोडणी वाहतूक असेल तेवढीच एफ आर पी तून वजा करण्यात यावी. काटामारीतील होणारी शेतकयांची लूट थांबवण्यासाठी संगणिकृत ऑनलाईन वजन काटे याच्या संदर्भात सरकारने ताबडतोब धोरण जाहीर करावे.

'महाराष्ट्राचे हक्काचे पाणी अवैधपणे गुजरातला, आमदारांना या कराराची माहिती नाही'

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळा मार्फत साखर कारखाने अथवा वाहनधारकांना ऊस तोडणी मजूर पुरवण्याचे धोरण निश्चित करावे. केंद्र सरकारने साखरेची किंमत 3500 रू क्विंटल करावी. तसेच इथेनॉलच्या खरेदीची किंमत प्रती लिटर 5 रूपयेने वाढवावा. केंद्र सरकारने ऊसदर नियंञण अध्यादेश 1966 मध्ये दुरूस्ती करून एफ आर पी ठरवण्याचे सुञ नव्याने तयार करावे.

साखर कारखान्यांना नाबार्डकडून ५ टक्के व्याजदराने माल तारण कर्ज देण्यात यावे या बाबींवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या मागण्याबाबत बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सांगितले. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी वरील मागण्याबाबत सकारात्मक गोष्टी सांगून राज्य सरकार व केंद्र सरकारच्या धोरणात्मक गोष्टीबाबत निर्णय घेतल्यास ऊस उत्पादक शेतक-यांना व साखर उद्योगास लाभ होईल.

महत्वाच्या बातम्या;
महाराष्ट्रात समान नागरी कायदा होणार? देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य
अखेर राजू शेट्टी यांच्यापुढे सरकार झुकले, आता उसाला मिळणार डिजिटल वजनकाटे
पीक विमा योजनेचे काम बघणाऱ्या कंपनीची कार्यालये बंद, शेतकऱ्यांची मोठी फसवण

English Summary: distance sugar mills reduced 25 km to 15 km, Chief Minister
Published on: 01 December 2022, 12:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)