News

खेड तालुक्यातील हिंद केसरी (Hind Kesri) दावडी बैलगाडा घाटात काही दिवसांपूर्वी एकट्या बैलाने बैलगाडा ओढत फळीफोड करून पहिल्या नंबरात बारी भिडवून घाटातील सर्वांना अचंबित केले होते. दावडी ग्रामस्थांनी येथील सनी नावाच्या बैलाचा वाढदिवस बैलगाडा घाटातच मोठ्या जल्लोषात केक कापून आणि वाजत-गाजत मिरवणूक काढत साजरा केला आहे.

Updated on 24 April, 2022 11:36 AM IST

देशात अनेक हौशी लोक असतात, आता ग्रामीण भागात सध्या यात्रा-जत्रांचा उत्सव सुरू असून खेड तालुक्यातील हिंद केसरी (Hind Kesri) दावडी बैलगाडा घाटात काही दिवसांपूर्वी एकट्या बैलाने बैलगाडा ओढत फळीफोड करून पहिल्या नंबरात बारी भिडवून घाटातील सर्वांना अचंबित केले होते. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. सनी (Sunny) बैल धुरेकरीला जुंपला असताना त्याचा सहकारी जुपनीतून निसटला आणि सनीने एकट्याने बैलगाडा घेऊन पहिल्या नंबरात बारी भिडवली होती.

असे असताना आता दावडी घाटात बैलगाडा शर्यतींचा थरार (Bullock cart racing in pune) पाहायला मिळत आहे. दावडी ग्रामस्थांनी येथील सनी नावाच्या बैलाचा वाढदिवस बैलगाडा घाटातच मोठ्या जल्लोषात केक कापून आणि वाजत-गाजत मिरवणूक काढत साजरा केला आहे. यामुळे या वाढदिवसाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

या वाढदिवसामध्ये सनीला सजवून केक भरून चांदीची गदाही भेट देण्यात आली. मोठ्या संख्येने यावेळी बैलगाडा मालक उपस्थित होते. दावडी ग्रामस्थांनी या सनी बैलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. बैलगाडा घाटातच हा उत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी घरातील व्यक्तीप्रमाणे हा वाढदिवस साजरा केला गेला.

यावेळी वाजत-गाजत मिरवणूक काढत सनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी हौसेला मोल नसते असे म्हटले जाते. यामुळे अनेक ठिकाणी घरातील प्राण्यांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. अनेक ठिकाणी शेतकरी आपल्या प्राण्यांवर किती प्रेम करतो, हे दिसून येते. सध्या बैलगाडा शर्यत सुरु झाल्याने अनेक ठिकाणी शर्यतींचे आयोजन केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या;
पोस्ट ऑफिस बचत योजनेत 333 रुपयांच्या गुंतवणुकीवर 16 लाख मिळवा, जाणून घ्या होईल फायदा..
महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची सेंद्रिय शेती मार्गदर्शनासाठी पंजाबवारी, शेतकऱ्यांना होणार फायदा...
आता गाय पाळण्यासाठी घ्यावा लागणार परवाना, जाणून घ्या काय आहे हा नवा नियम

English Summary: Discussion of Sunny's birthday in the state !! Celebrated birthday by giving silver mace ..
Published on: 24 April 2022, 11:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)