महात्मा फुले कर्ज माफी योजना चे नाशिक जिल्ह्यात 900 कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी 600 कोटी रुपये शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात पुन्हा वितरित करण्यात आले.
उरलेली 300 कोटी रुपये शेतकऱ्यांना कर्ज रूपाने वितरित करण्याचे आदेश असताना देखील ही रक्कम शेतकऱ्यांना न देता ती बँकेच्या ठेवीदारांना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याची गंभीर दखल नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिल्याने संबंधित अधिकारी तसेच बँकेचे तत्कालीन अध्यक्ष अन संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहे. सोमवारी नऊ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खरीप हंगाम, जिल्हा क्रीडा विभाग आणि इतर महत्वाच्या बैठका झाल्या.
यावेळी ही गोष्ट समोर आल्यानंतर भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की महा विकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच अधिवेशनातमहात्मा फुले कर्ज माफी योजना राज्यात लागू केली यातून शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्यात आले. राज्य शासनाचे कर्जमुक्ती चे नियम डावलण्यात आल्याचा ज्यातून समोर आल्याने या प्रकाराची खंबीरपणे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दखल घेतली व चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:ब्रेकिंग : भर सभेत प्रांतअधिकाऱ्याची तक्रार थेट अजित पवारांकडे, आणि पुढे…
Published on: 10 May 2022, 06:13 IST