News

शेतमालाच्या खरेदीसाठी शासनाने हमीभाव केंद्र सुरू केले आहेत. परंतु बुलढाणा जिल्ह्यात शेतमालाची हमी भावाने खरेदी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर बारदान टंचाईची समस्या जाणवत असून खरेदी बंद ठेवावी लागली आहे.

Updated on 02 April, 2022 8:18 AM IST

शेतमालाच्या खरेदीसाठी शासनाने हमीभाव केंद्र सुरू केले आहेत. परंतु बुलढाणा जिल्ह्यात शेतमालाची हमी भावाने खरेदी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर बारदान टंचाईची समस्या जाणवत असून खरेदी बंद ठेवावी लागली आहे. 

अजूनही बुलढाणा जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात बारदाना ची गरज कायम आहे.

 शासकीय हमीभाव केंद्रांवर हरभरा खरेदी प्रभावित

 हरभरा खरेदी ही आधारभूत किमतीत  करता यावी यासाठी शासकीय केंद्र उघडण्यात आलेले आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाफेडचे हमीभाव  खरेदी केंद्रांवर बारदान उपलब्ध नसल्याचा परिणाम झाला होता. यासंबंधी जिल्हा पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला व त्यानंतर 50000 बारदान उपलब्ध झाल्याची माहिती मिळाली आहे

नक्की वाचा:गोष्ट छोटी पण परिणाम मोठा! या बाजार समितीचा निर्णय आहे छोटा परंतु शेतकऱ्यांसाठी आहे खूप महत्त्वाचा, वाचा सविस्तर

बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर सुमारे पाच लाख बारदान याची गरज असून  आतापर्यंत केवळ पावणेदोन लाख बारदाना चा पुरवठा करण्यात आलेला आहे. गरजेइतके बारदान उपलब्ध करण्यात आले नाही तर खरेदी खंडित पडण्याची भीती आहे. पणन विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत हरभऱ्याची 62 हजार क्विंटल खरेदी झाली असून किमान दोन लाख बारदान लागणार असल्याचे पणन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाच लाख बारदाना ची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. परंतु मागणीप्रमाणे बारदान याची टंचाई असल्याने पुरवठा हळू वतीने केला जात आहे.

नक्की वाचा:बैलगाडा शर्यती मधले खटले मागे; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय

बुलढाणा जिल्ह्यामध्ये अकरा हरभऱ्याचे खरेदी केंद्र असून यामध्ये 18 हजार शेतकऱ्यांनी हरभरा विक्री ची नोंदणी केलेली आहे. 

या नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना पैकी तीन हजार 751 शेतकऱ्यांचा सुमारे 62 हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आलेला आहे. अजूनही नोंदणी झालेल्या पैकी 14 हजार पेक्षा जास्त शेतकर्‍यांचा हरभरा विक्री व्हायचा बाकी आहे. एवढ्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यासाठी अजून काही प्रमाणात बारदान लागणार आहे. आता टप्प्याटप्प्याने बारदान मिळू लागला असला तरी संपूर्णपणे हा प्रश्न मिटलेला नाही. त्यामुळे हरभरा खरेदी केंद्रांवर हरभऱ्याची खरेदी  प्रभावित झाली आहे.

English Summary: dificiency of bag in gram crop msp center so gram crop purchase effective
Published on: 02 April 2022, 08:18 IST