News

आपल्याला माहित आहेच की मागच्या काही महिन्यांपासून राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अक्षरश: पिकांची नासाडी झाली आहे. नेहमीप्रमाणेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाकडे अहवाल सादर करण्यात आले होते व त्या दृष्टिकोनातून शेतकरी हिताचे निर्णय देखील घेण्यात आले. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली तेव्हा या बैठकीत साडेचार हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Updated on 20 October, 2022 7:43 PM IST

नक्की वाचा:आता संपूर्ण कुटुंबासाठी एकच स्मार्टकार्ड मिळणार, महसूलमंत्र्यांची ही मोठी घोषणा

तसेच कालपर्यंत जो काही परतीच्या पावसाने नुकसान केले आहे त्याची देखील तत्काळ पंचनामे केले जातील व लवकर अहवाल पाठवल्यास लवकरात लवकर मदत देण्यात येईल असे देखील त्यांनी म्हटले.पुढे बोलताना त्यांनी सांगितले की दीड महिन्यात सात हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचली व हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

नक्की वाचा:Breaking: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय! भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, आणखी बरंच काही

पंचनाम्याच्या बाबतीत हा सरकारचा प्लान

 आजच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की," शेतीचे नुकसान भरपाईची योजना आता सॅटॅलाइट बेस होणार आहे. त्यामुळे आता पावसामुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यावर आता कोणालाही पंचनामा करावा लागणार नाही.

उपग्रहाच्या माध्यमातून थेट नुकसानीची अथवा घटनास्थळाची माहिती मिळेल आणि त्यानंतर त्या आधारावर ऑटो पायलट मोडवर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल.  लवकरच या संबंधीची सिस्टम उभारली जाणार आहे."

नक्की वाचा:पाऊस काही थांबेना! येत्या 5 दिवसांत राज्यभर बरसणार, या जिल्ह्यांमध्ये तीव्र पावसाचा इशारा

English Summary: devendra fadanvis big aanouncement about panchnama of crop damage due to heavy rain
Published on: 20 October 2022, 07:43 IST