News

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परताव्याची मुदत सात वर्षापर्यंत वाढवणे व ज्या जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टर साठी कर्ज प्रकरणांना मान्यता देण्यात आली नाही अशा जिल्ह्यात तातडीने प्रकरणे मंजूर करण्याचा निर्णय मंत्रालयातील बैठकीत घेण्यात आला.

Updated on 23 May, 2022 12:50 PM IST

 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परताव्याची मुदत सात वर्षापर्यंत वाढवणे व ज्या जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टर साठी कर्ज प्रकरणांना मान्यता देण्यात आली नाही अशा जिल्ह्यात तातडीने प्रकरणे मंजूर करण्याचा निर्णय मंत्रालयातील बैठकीत घेण्यात आला.

तसेच संबंधित योजनेमध्ये सहकारी बँकांचा सहभाग वाढावा यासाठी साखर आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हानुरूप बैठकीचे नियोजन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. अण्णासाहेब पाटील महामंडळ कडून देण्यात येणाऱ्या व्याज परताव्याट्रॅक्टर खरेदीच्या कालावधीबाबत मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी काही प्रश्न उपस्थित केले होते तसेच या महामंडळाच्या  योजनांमधून ट्रॅक्टर खरेदीच्या मागण्या मोठ्या प्रमाणात आल्याने ट्रॅक्टर देणे बंद केले होते.

या पार्श्वभूमीवर याचा फटका अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला असल्यामुळे योजना पुन्हा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु याला सरसकट परवानगी न देता ज्या जिल्ह्यात ट्रॅक्टर वाटप झालेले नाही अशा जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टर वाटप करण्यास मान्यता देण्यात आली.

 सारथीच्या कामांचा आढावा

 महाराष्ट्रात छत्रपती राजाराम महाराज गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या जवळ जवळ अकरा हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी नऊ हजार 600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

आतापर्यंत या शिष्यवृत्तीचा लाभ राज्यातील सात हजार 674 विद्यार्थ्यांनी घेतला असून या विद्यार्थ्यांना 77 कोटी 36 लाख रुपये शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अजून पर्यंत शिष्यवृत्ती मिळाली नाही अशा विद्यार्थ्यांना मे महिन्याच्या शेवटपर्यंत वाटप करण्यात येईल अशी माहिती बैठकीत देण्यात आली. 

तसेच या बैठकीमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि सारथी यांच्यामार्फत ज्या योजना राबवण्यात येतात त्या योजनांचा आढावा घेण्यात आला.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:आता निसर्गानेही सोडली शेतकऱ्यांची साथ, अतिरिक्त ऊसावर पावसाची अवकृपा

नक्की वाचा:7th Pay Commission: 7व्या वेतन आयोगानंतर 8वा वेतन आयोग येणार की नाही? जाणून घ्या अपडेट

नक्की वाचा:Ration Card News:सरकारकडून रेशन कार्ड तपासणीचे आदेश,'या' लोकांचे होणार रेशनकार्ड रद्द

English Summary: deputy chief minister ajit pawar give some instruction about annasaheb patil aarthik vikas mahamandal
Published on: 23 May 2022, 12:50 IST