शेती हेच शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन आहे. कितीही काळजी घेतली तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच नुकसानीला सामोरे जावे लागते. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळते. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांचे नुकसानीच्या क्षेत्राचे पंचनामे करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने केली आहे.
मंगळवारी या संदर्भातील पत्र राज्याच्या कृषी आयुक्तांना पाठविण्यात आले आहे. कृषी सहायक संघटनेच्या माहितीनुसार, राज्यात दरवर्षी अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होते. अशा वेळेस शेतकऱ्यांना ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीच्या क्षेत्रासाठी मदत देण्यात येते. झालेल्या नुकसानीच्या क्षेत्राचे सर्वेक्षण आणि पंचनामे, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्या पथकांकडून केले जाते.
मात्र १९७९, १९८२ व १९८३ मधील शासन निर्णयामध्ये तलाठी व ग्रामसेवक यांनाच हे काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, यात कुठेही कृषी सहायकांचा संबंधित शासन निर्णयामध्ये उल्लेख नाही. त्यामुळे नुकसानीच्या क्षेत्राचे सर्वेक्षण व पंचनामे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक या त्रिस्तरीय पथकाकडून कधीपासून सुरू झाले? या पथकात कृषी सहायकांचा समावेश कधी केला गेला, कृषी सहायकांनी या पथकासोबत हजर राहून काय काम करावे, या बाबतच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत.
बफर स्टॉक राखण्यासाठी नाफेडमार्फत केंद्र सरकारची 52,460 टन कांदा खरेदी
सर्वेक्षण आणि पंचनामे झाल्यानंतर त्यांचे संकलन करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी ही तलाठ्यांवर आहे मात्र असं असतांनाही कृषी विभागाला तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. विनाकारण कृषी विभागाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे असल्याचं संघटनेने म्हटले आहे.या सगळ्या गैरसमजुती दूर करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्याची अपेक्षाही संघटनेने व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
'आयराम कैची' २०० वर्षांपूर्वीचे फणसाचे झाड; तमिळ ग्रंथ आणि साहित्यातही आहे उल्लेख
पावसानेही सोडली शेतकऱ्यांची साथ; तब्बल 50 क्विंटल कांदा पावसाने आणला रस्त्यावर
Published on: 25 June 2022, 05:18 IST