News

नैसर्गिक आपत्ती तसेच बाजारामध्ये भाजीपाल्याचा दराचा चढउतार असल्याने शेतकरी वर्ग नेहमी अडचणीत राहिलेला आहे, जे की मागील दोन वर्षांपासून शेतकरी वर्ग कोरोनाचा संसर्गाचा सामना करत आहे.आणि त्यात भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना लागलेला आहे अशी अवस्था निर्माण झालेली आहे. निफाड मधील बाजारपेठेत कालच्या शनिवारी जे दर कोसळले त्यामुळे शेतकरी वर्ग अधिकच आर्थिक संकटात सापडला.

Updated on 07 September, 2021 6:52 AM IST

नैसर्गिक आपत्ती तसेच बाजारामध्ये भाजीपाल्याचा दराचा चढउतार असल्याने शेतकरी वर्ग नेहमी अडचणीत राहिलेला आहे, जे की मागील दोन वर्षांपासून शेतकरी वर्ग कोरोनाचा  संसर्गाचा सामना करत आहे.आणि त्यात भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांसाठी (farmer) दुष्काळात तेरावा महिना  लागलेला  आहे  अशी  अवस्था  निर्माण  झालेली  आहे. निफाड  मधील बाजारपेठेत कालच्या शनिवारी जे दर कोसळले त्यामुळे शेतकरी वर्ग अधिकच आर्थिक संकटात सापडला

शेतकरी पुन्हा संकटात सापडला:

शेतकरी वर्गाने कोरोना या संसर्गाचा सामना करत यावेळी पोषक वातावरण भेटल्याने निफाड मधील शेतकऱ्याने आपल्या शेतीत अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून चांगल्या प्रकारे भाजीपाला पिकवला मात्र बाजारामध्ये भाज्यांचे दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.निफाड मधील शेतकऱ्यांनी आर्थिक संकटे असताना सुद्धा  त्यांच्या   शेतामध्ये  भाजीपाला पिकवला होता. परंतु मागील पंधरा दिवसापासून बाजारामध्ये भाजीपाल्याचे दर अधिकच कोसळले गेल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला.शेतकऱ्याने शेतामध्ये जे टोमॅटो, सिमला, वांगे, कोबी, फ्लॅावर, कोथिंबीर, शेपू, मेथी, काकडी, कारले हे सर्व भाजीपाला खूप कमी दराने जात आहे.

हेही वाचा:अमेरिकन लष्करी अळीचा मका पिकावर प्रादुर्भाव, महागडी औषधे जरी फवारली तरी सुद्धा शेतकऱ्याच्या पदरी अपयश

शेतकरी जेव्हा पासून भाजीपाल्याची  आपल्या शेतात लागवड करतो तेव्हापासून तर बाजारात आणेपर्यंत लाखो रुपये खर्च होतो आणि सध्या अशा परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग  निराश झाला आहे.कधी निसर्ग आपत्ती तर कधी हा पडलेला बाजारभाव त्यामुळे शेती (farming) हा बेभरोषेचा व्यवसाय झालेला आहे आणि शेतकऱ्याच्या पदरात नेहमी  अपयश च  पडत आहे. मागील १५ दिवसापासून बाजारामध्ये भाज्यांचे दर घसरत असल्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे गोंधळलेला आहे जे की हे भाव परवडत नसल्याने निफाड तालुक्यातील शेतकऱ्याने आपल्या  शेताच्या बांधावरच ढोबळी मिरची टाकून दिली आहे. शेतीमधून मिरची बाहेर काढत इतर पिकांसाठी शेत मोकळे केले जात आहे. जो पिकासाठी झालेला खर्च  आहे त्या  खर्चाचा  विचार न करता शेतकऱ्यांनी आपली वावरे मोकळी केली जात आहेत.

प्रतिकूल परिस्थितीमुळे जगणेही मुश्किल:-

शेतकरी आपल्या शेतामध्ये नेहमी नवीन नवीन प्रयोग करून दिवस रात्र कष्ट करत असतो मात्र निसर्ग साथ देत नाही आणि त्यामध्ये बाजारात नेहमी भाज्यांचे दर कोसळत असतात त्यामुळे जेवढा खर्च झालेला आहे तो सुद्धा त्यामधून निघत नाही.आणि यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत चाललेला आहे. कोरोना काळात अनेक लोकांचे काम गेले म्हणून आपण शेती कडे वळलो मात्र शेतीत सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे.भाजीपालाच नाही तर सर्वकाही कवडीमोल

फक्त भाजीपाला च नाही तर इतर पिके सुद्धा:-

बाजारपेठेत भाजीपाला चा भाव च नाही तर इतर जे पिके आहेत त्यांची सुद्धा परिस्थिती अशीच निर्माण झालेली आहे. बाजारात मुग, उडीद तसेच सोयाबीन पिकाला सुद्धा भाव मिळालेला नाही आणि अशा परिस्थितीत पावसाने सुद्धा दांडी मारलेली आहे. शेतातून मुग काढणी वेळेस च पाऊसाने पुन्हा हजेरी लावल्याने पूर्ण पीक पाण्यात गेले आहे.

English Summary: Debt burden falls on the head and the price falls on the other side, exactly how to farm?
Published on: 07 September 2021, 06:52 IST