नगर जिल्ह्यामध्ये सतत पाऊस सुरू आहे तरी सुद्धा काही ठिकाणी रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरणीला सुरुवात झालेली आहे. यंदाच्या वर्षी जवळपास ४ लाख ५८ हजार ६३६ हेक्टर सरासरी क्षेत्रावर ज्वारी चे पीक पाहायला भेटणार आहे. जे की कृषी विभागाचा असा अंदाज आहे की किमान यंदाच्या वर्षी एवढ्या क्षेत्रावर ज्वारी ची पेरणी केली जाईल. सध्या कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता पर्यंत २ हजार ८६१ हेक्टरवर ज्वारी या पिकाची पेरणी झालेली आहे.
नगर जिल्यामध्ये दरवर्षी रब्बी हंगामात सर्वात जास्त ज्वारी चे क्षेत्र असते. जे की मागील दोन ते तीन वर्षांपासून मात्र ज्वारीचे पीक घटत गेल्याचे चित्र सामोरे आले आहे. मागील काही वर्षांपासून नगर जिल्ह्यामध्ये साधारणपणे चार लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होत होती. मात्र मागील वर्षी नगर जिल्ह्यामध्ये त्याच्या निम्याने सुद्धा पेरणी झालेली नाही असे सूत्रांच्या माहितीनुसार समजले आहे. यंदाच्या वर्षी कृषी विभागाने ज्वारी पिकाचे क्षेत्र दोन लाख ६७ हजार ८३४ हेक्टर सरासरी क्षेत्र निश्चित केले आहे. सर्वसाधारणपणे नगरमधील काही भागात ज्वारी या पिकाची पेरणी ही ऑगस्ट महिन्यामध्ये होत असते. मात्र सध्या बऱ्याच भागात चांगला पाऊस पडत आहे जे की सातत्याने पाऊस चालू आहे.
जसे की आतापर्यंत नगर भागात रब्बी हंगामात २ हजार ८६१ हेक्टरवर ज्वारी या पिकाची पेरणी झालेली आहे. मात्र यंदाच्या वर्षी ८८ हजार ३७७ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी तर ८६ हजार ४०५ हेक्टरवर गहू या पिकाची पेरणी तर मका या पिकाची पेरणी ११८ हेक्टर क्षेत्रावर झालेली असल्याचे सांगितले जात आहे.
वाफसा होताच येणार पेरण्यांना वेग :-
नगर जिल्ह्यामध्ये करडई, जवस तसेच तीळ आणि सुर्यफुलया पिकांची पेरणी होत नसल्यामुळे सरासरी क्षेत्र कमी झालेले आहे. आता च्या स्थिती पर्यंत २1 हजार २०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी कांद्याची लागवड केलेली आहे. यंदा सतत पाऊस पडत असल्यामुळे अनेक भागातील जमिनी ओलाव्याने चिडबडल्या आहेत. पाऊस कमी झाला की वाफसा निघताच रब्बी हंगामातील पेरणीचा वेग येण्याचा अंदाज कृषी विभागाने लावलेला आहे.
Published on: 03 October 2022, 03:44 IST