News

राज्यात मोठ्या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लगली, तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा होताच हॉटेलमध्ये आमदारांनी एकच आनंद व्यक्त केला, अनेक आमदारांनी यावेळी टेबलवर चढून डान्स देखील केला.

Updated on 02 July, 2022 11:29 AM IST

राज्यात मोठ्या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लगली, तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. अचानक हे सर्व घडल्याने अनेकांना धक्काच बसला. एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घोषित करत फडणवीसांनी एक (Devendra Fadnavis) मास्टरस्ट्रोक मारला. यामुळे फडणवीस नेमकी काय भूमिका बजावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, अगोदर त्यांनी ते मंत्रीमंडळाच्या बाहेर असतील असे म्हटले गेले, मात्र पुन्हा सगळी सूत्र हलली, आणि ते उपमुख्यमंत्री झाले.

एकनाथ शिंदे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा होताच हॉटेलमध्ये आमदारांनी एकच आनंद व्यक्त केला, अनेक आमदारांनी यावेळी टेबलवर चढून डान्स देखील केला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर टीका केली होती. मुंबईत झालेल्या या शपथविधी सोहळ्यानंतर शिंदे हे समर्थक आमदारांना संबोधित करताना त्यांनी त्यांच्या नृत्यावर तीव्र आक्षेप नोंदवला.

यावेळी भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, याची काळजी घेण्यास सांगितले आहे. ते म्हणाले, नागरिकांनी निवडून दिलेल्या आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या आमदारांना हे शोभत नाही. यानंतर आनंदाच्या भरात अशा चुका होतात, असे दीपक केसरकर म्हणाले. या आमदारांच्या डान्स विडिओवर अनेकांची टीका केली, तसेच यावर अनेक जोक्स देखील सोशल मीडियावर येत होते.

संधीवातावर गुणकारी ठरतो कोबी, असा करा वापर, संधीवात जाईल पळून

राज्यात 10 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यामुळे अनेकांना मोठा धक्क्काच बसला, तेच मुख्यमंत्री होतील असे म्हटले जात होते. यामुळे याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

महत्वाच्या बातम्या;
डेअरीला दुध घालताना ही काळजी घेत का? होईल फायदा..
ईडीची कारवाई मात्र जरंडेश्वर कारखान्याचे दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी गाळप
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नाही ५० हजार रुपयांचे अनुदान? वाचा अटी

English Summary: dance on the table, Eknath Shinde slapped the MLAs
Published on: 02 July 2022, 11:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)