News

मागील दोन-तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात असलेल्या ढगाळ हवामानअवकाळी पाऊस नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सटाणा देवळा या तालुक्यातील हंगामपूर्व द्राक्ष बागांना या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

Updated on 20 December, 2020 9:08 AM IST

मागील दोन-तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात असलेल्या ढगाळ हवामानअवकाळी पाऊस नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सटाणा देवळा या तालुक्यातील हंगामपूर्व द्राक्ष बागांना या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.द्राक्षांना तडे जाण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे.  बागलाण तालुक्यातील 53 गावातील सुमारे दोनशे हेक्‍टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये जवळजवळ साडेसहाशे शेतकऱ्यांचे  अधिक नुकसान झाले. तसेच या वातावरणाचा फटका शेवगा पिकाला बसला.

मागच्या वर्षीचा विचार केला तर नैसर्गिक संकटाचा सामना केल्यानंतर याहीवर्षी आर्थिक नुकसानीचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला. द्राक्षं बरोबर कांदे डाळिंब या पिकांचे मोठ्या प्रमाणात . होताना दिसत आहे.बदललेल्या वातावरणाचा नुकसान रोखण्यासाठी शेतकरी फवारणीचा खर्च करताना दिसत असून हा खर्च आवाक्याबाहेरचा आहे. द्राक्ष बागांचे घड पाणी उतरण्याच्या स्थितीत आहेत.  मात्र वातावरण बदलामुळे फळांना तडे जाण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.


हेही वाचा :पीएम किसान योजना : जाणून घ्या ! कधी येतो आपल्या खात्यात २ हजार रुपयांचा हप्ता

नाशिक जिल्ह्यातील निफाड दिंडोरी अन्य भागातील द्राक्षबागा फुलोरा प्रक्रियेतून पुढे गेले आहेत   त्यामुळे त्यांना पावसाची झड बसली नसल्याचे शेतकरी सांगतात.  तर अन्य पिकांची लागवड   झाली असल्याने  त्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नसल्याचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

English Summary: Damage to around 200 hectares of pre-season grapes in Nashik district
Published on: 20 December 2020, 09:08 IST