देशात मागील काही महिन्यात सिलिंडरच्या किंमतीत कपात झाल्यानंतर आता आज 1 नोव्हेंबरला पुन्हा गॅस सिलिंडरच्या किंमती बदलल्या आहेत. देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर निश्चित करतात. आज व्यावसायिक
एलपीजी सिलिंडर दरांत (Commercial LPG Cylinder) कपात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनो असे वाढवता येईल तूरीचे उत्पादन, फक्त असे करा व्यवस्थापन
देशामध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत आज 115 रुपयांची कपात झाली आहे. यामुळे मुंबईत आता व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1696
झाली आहे, जी यापूर्वी 1844 रुपये एवढी होती. दरम्यान, ही कपात फक्त व्यावसायिक सिलिंडर दरांत करण्यात आली असून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात झाली नाहीये.19 किलोच्या सिलिंडरचे नवे दर:मुंबईत व्यावसायिक सिलिंडर दर 1844 रुपये होता,
त्याची किंमत आता 1696 झाली आहे.चेन्नईत एलीपीसी सिलिंडर दर 2009.50 रुपये होता. तर आता त्याची किंमत 1893 झाली आहे.कोलकत्ता येथे व्यावसायिक सिलिंडर दर 1995.50 रुपये होता तर, आता त्याची किंमत 1846 रुपये झाली आहे.14.2 किलो सिलिंडरचे नवीन दर:▪️कोलकत्ता - 1079 रुपये▪️ दिल्ली - 1052 रुपये▪️ मुंबई - 1052.5 रुपये▪️ चेन्नई - 1068.5 रुपये
Published on: 01 November 2022, 03:24 IST