सध्या महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात मोठ्या प्रमाणात वारे वाहत आहे. सध्या बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनार्याकडे सरकत आहे. यामुळे यामध्ये मोठया प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ते अतिशय धोकादायक रूप धारण करत आहे. यामुळे यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. कच्छच्या जखाऊ येथे आज दुपारी चार ते आठच्या दरम्यान जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
यामुळे अनेकांना तेथून हलवले आहे. या भागातील लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. ७४,००० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी त्यांची सोय करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनो पावसाळा येतोय, पावसाळ्यात जनावरांची कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या...
आठ किनारी जिल्ह्यांतील एकूण ७४,३४५ लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यात नेण्यात आले. एकट्या कच्छ जिल्ह्यात सुमारे ३४,३०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. यानंतर जामनगरमध्ये १०,०००, मोरबीमध्ये ९,२४३ राजकोटमध्ये ६,०८९ देवभूमी द्वारकामध्ये ५,०३५ जुनागढमध्ये ४,६०४ पोरबंदरमध्ये ३,४६९ आणि गिर सोमनाथ जिल्ह्यात १,६०५ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
५५०० रुपये लिटरला गाढवाचे दूध विकणारा हा माणूस झाला करोडपती
आता हे वादळ किती नुकसान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्र आणि राज्य सरकार देखील यावर लक्ष ठेवून आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
शेतकऱ्यांनो कोंबड्या संभाळा! कोल्हापूरमध्ये चोरट्यांनी कोंबड्या पळवल्या..
कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी आडवला मुंबई- आग्रा महामार्ग..
शेतीची अवजारे चोरणारी टोळी अखेर जेलबंद! पोलिसांनी अवजारेही केली जप्त..
Published on: 15 June 2023, 11:50 IST