News

Crop Ruined: गेल्या काही दिवसांपासून देशात मान्सूनचे सत्र सुरु आहे. देशातील काही भागात समाधानकारक पाऊस पडला आहे तर काही भागात मुसळधार पावसाने खरीप पिके उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे.

Updated on 10 October, 2022 2:40 PM IST

Crop Ruined: गेल्या काही दिवसांपासून देशात मान्सूनचे (Monsoon) सत्र सुरु आहे. देशातील काही भागात समाधानकारक पाऊस (Rain) पडला आहे तर काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) खरीप पिके उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा (Crop Insurance) काढला आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे.

गेल्या तीन दिवसांपासून उत्तर प्रदेश, महाराष्ट्र (Maharashtra), मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंडसह इतर राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. उशिरा आलेली खरीप पिके आणि रब्बी पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

राज्य सरकारांनीही शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकरी चिंतेत आहेत. पिकांची भरपाई कशी मिळणार? आज तुम्हाला सांगणार आहोत की पीएम फसल विमा योजनेत नोंदणी करून शेतकरी पिकांचा विमा सहज मिळवू शकतात.

Big Breaking: माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ऑनलाइन अर्ज कसा करावा

शेतकऱ्यांनी अर्ज भरायचे आहेत. हा फॉर्म ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही उपलब्ध आहे. तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही पीएम फसल विमा योजनेच्या https://pmfby.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता.

दुसरीकडे, ऑफलाइन अर्जासाठी, शेतकरी जवळच्या बँक, सहकारी संस्था किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट देऊन अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांना हा विमा पेरणीनंतर 10 दिवसांच्या आत काढावा लागणार आहे.

ही कागदपत्रे आवश्यक आहेत

1.शिधापत्रिका
2.आधार कार्ड लिंक केलेले बँक खाते
3.एक वैध ओळखपत्र
4.एक पासपोर्ट आकाराचा फोटो
5.शेत खसरा क्रमांक
6.रहिवासी पुरावा (ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र इ.)
7.जर शेत भाड्यावर असेल तर शेत मालकाचे संमतीपत्र

राज्यात मुसळधार मान्सूनचे सत्र सुरूच! या भागांना यलो अलर्ट जारी

इतका प्रीमियम

पीएम फसल बीमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अत्यंत कमी निश्चित प्रीमियम भरावा लागतो. शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी विम्याच्या रकमेच्या 2%, रब्बी पिकांसाठी 1.5% आणि व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी कमाल 5% भरावे लागतात. उर्वरित प्रीमियमची रक्कम राज्य आणि केंद्र सरकार भरेल.

72 तासांच्या आत कंपनीला सूचित करा

पाऊस, पूर किंवा अन्य आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत विमा कंपनीला कळवा. विमा कंपनी सर्वेक्षण करून पिकावर आपत्तीचा किती परिणाम झाला हे पाहणार आहे. मूल्यांकनानंतर, अहवाल तयार केला जाईल आणि त्याच्या प्रतिपूर्तीसाठी पैसे तुमच्या खात्यात पाठवले जातील.

महत्वाच्या बातम्या:
लाभार्थ्यांनो पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता येणार की नाही? जाणून घ्या सविस्तर...
क्रूड ऑइलच्या दरात घसरण! आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती झाला बदल; जाणून घ्या नवे दर

English Summary: Crop Ruined: Crop insurance will not be available without these documents; Know in detail
Published on: 10 October 2022, 02:40 IST