मंत्रालयात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्व प्रमुख पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यावेळी येत्या आठ दिवसांत पीक विम्याची भरपाई रक्कम मिळणार असल्याची माहिती दिली आहे. पावसामुळे नुकसान झाल्यामुळे विमा भरपाई मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची आहे.
नैसर्गिक आपत्ती आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई रक्कम लवकरात लवकर देण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपन्यांची आहे. तसेच विमा मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपन्यांनी विचारात घ्यावे.
दुबार नोंदणीपैकी केवळ एक नोंद ग्राह्य धरावी. नोंदणी केलेला कोणताही शेतकरी या प्रक्रियेपासून आणि विमा रक्कम मिळण्यापासून वंचित राहणार नाही, असे आदेश दिले आहेत. याबाबत विमा कंपन्यांनीही दक्षता घ्यावी, असे म्हटले आहे.
टोमॅटोचे दर घसरले, खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत
तसेच जेथे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यासंदर्भात अडचणी आहेत, त्याची पडताळणी करुन त्या सोडवल्या जात आहेत, असे विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले. यामुळे लवकरच हे काम पूर्ण होईल.
देशातील गव्हाचा साठा आला निम्म्यावर, दर वाढण्याची शक्यता..
दरम्यान, ज्या ठिकाणी सर्वे पूर्ण झाले आहेत. अशा ठिकाणी विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या;
उसाच्या गाळपात बारामती अॅग्रो सर्वात पुढे, जिल्ह्यात 18 लाख मॅट्रिक टन गाळप पूर्ण
दोन राज्यपालपदे आणि दोन केंद्रीय मंत्रीपदे! शिंदे गटाच्या 'या' नेत्यांची लागणार वर्णी
LIC Jeevan Shiromani: 4 वर्षांच्या गुंतवणुकीत 1 कोटीपर्यंतचा फॅट फंड, जाणून घ्या सविस्तर..
Published on: 16 November 2022, 12:56 IST