अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीनसह सर्व खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 2 लाख 19 हजार 105 हेक्टरवरील 4 लाख 61 हजार 407 शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे. मराठवाड्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचवेळी पीक विमा कंपन्यांचे अधिकारी शेतकऱ्यांना योग्य वागणूक देत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.
त्यानंतर सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत विमा कंपनीचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश दिले. त्यानंतर, त्यानुसार प्रत्येक तालुकास्तरावर पीक विमा कंपन्यांची कार्यालये तातडीने सुरू करण्यात आली आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
तसेच शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. अब्दुल सत्तार यांच्या दौऱ्यात जिंतूर तालुक्यातील पीक विमा कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर जिल्ह्यातील पीक विमा कंपनीची सर्व कार्यालये बंद असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे त्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे.
आंदोलनाला यश! पहिली उचल 3100, कारखान्याचे धुराडे सुरू..
अनेक भागात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीनसह सर्व खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 2 लाख 19 हजार 105 हेक्टरवरील 4 लाख 61 हजार 407 शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे.
सणसर येथे ऊस परिषदेचे आयोजन, एफआरपीसाठी राजू शेट्टी आक्रमक
यामुळे आता शेतकरी मदतीची मागणी करत आहेत. दरम्यान, नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक यावे अशी मागणी करत, नुकसान भरपाईसाठी केंद्राने मदत करण्याबाबत मागणी देखील करणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
'नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकांची मागणी करणार'
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 'या' तणनाशकावर बंदी, सरकारने घेतला निर्णय..
LIC देत आहे 20 लाख रुपये, घरबसल्या करा असा अर्ज...
Published on: 31 October 2022, 05:07 IST