महागाईने तर सर्वसामान्यांचे जीवन जगणे मुश्कील करून टाकले आहे. खाद्य तेलाचे भाव गगनाला आहेत. त्यासोबतच पेट्रोल आणि डिझेलचे दर सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
पाच राज्यातील विधानसभानिवडणुकांची रणधुमाळी संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी भडका घेतला आहे. आज सलग सहावा दिवस असूनपेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरूच आहे. आतापर्यंतची वाढ पावणेचार रुपयांवर गेली असून सर्वसामान्यांना ऐन उन्हाळ्यात चटका देत आहे. जर आज पर्यंतच्या पेट्रोल आणि डिझेल मधील दरवाढीचा विचार केला तर चार महिन्यानंतरही दरवाढ सुरू झाली आहे. जर मागील पाच दिवसांचा विचार केला तर चार वेळा प्रतिलिटर 80 पैसे वाढ करण्यात आली असून पेट्रोलच्या दरात आज पन्नास पैसे आणि डिझेलच्या दरात 55 पैसे वाढ करण्यात आली आहे.
नक्की वाचा:Job Alert: परीक्षा न देता 12वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी
त्यामुळे सहा दिवसात पेट्रोल व डिझेलचे दर सुमारे पावणे चार रुपयांनी महागले आहे. दिल्लीत 99.11 पेट्रोलचा दर प्रति लिटर असून डिझेलचा दर 90.42 रुपयांची वाढ झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने पेट्रोलआणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर बारा ते 25 रुपयांपर्यंत वाढ होईल असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.
पेट्रोल आणि डिझेल दरवाढी मागील पार्श्वभूमी
सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असूनया युद्धाच्या झळा सगळ्यांनाच बसत आहेत.यामुळे खनिज तेलाच्या भावांमध्ये भडका उडाला असून खनिज तेलाचा भाव प्रती बॅरल 110 गेला आहे.त्यामुळेपेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही परंतु तरीदेखीलचार महिन्यांपासून आपल्याकडेदर हे स्थिर होते.
कारणराज्यांच्या विधानसभा निवडणुका होत्या आणि या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतरपेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमती मध्ये अचानक वाढ करण्यात आली.एवढेच नाही तर सीएनजीच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे.
सरकारने मागच्या चार नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपयेआणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात दहा रुपये कपात केली होती त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून देखील दरवाढ थांबविण्यात आली होती परंतु ती आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
Published on: 27 March 2022, 12:07 IST