सध्या राज्य सरकारच्या नवीन वाळू धोरणानुसार ६०० रुपये ब्रासने वाळूची खरेदी करता येणार आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्याचा सरकारचा प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारने जोरदार तयारी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी धोरण राबवले जात आहे. आता राज्यातील ६५ वाळू डेपोतून वाळूची खरेदी करता येणार आहे. राज्यातील पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती जिल्ह्यात वाळू डेपो सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने जिल्हानिहाय वाळू डेपोची संख्या निश्चित केली आहे. वाळू खरेदीदार महाखनिज या संकेतस्थळावरून वाळूची खरेदी करू शकतात. यामुळे स्वस्त दरात ही वाळू मिळणार आहे.
लाल भेंडी शेतकऱ्यांना बनवेल श्रीमंत, या पद्धतीने करा लागवड..
महाखनिजवर वाळू विक्री उपलब्ध करून दिली असून ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर घरपोच वाळू मिळणार आहे. ऑनलाइन नोंदणी करताना वाळू खरेदीदाराला वाहन क्रमांक नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे.
तसेच या महाखनिजवर दररोज होणार वाळूच्या विक्री संबंधीची माहितीही देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यातील ६५ वाळू डेपोपैकी १८ वाळू डेपो पुणे जिल्ह्यासाठी देण्यात आले आहेत.
अखेर शेतकऱ्यांसाठी ती बातमी आलीच! आता शेततळ्यासाठी अर्ज सुरु, जाणून घ्या कुठे आणि कसा करायचा अर्ज...
तसेच नागपूर जिल्हयासाठी ३५, अमरावती जिल्हयासाठी ४ आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ८ डेपो उभारण्यात आले आहेत. वाहनांचा पर्याय नोंदणी करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
पांढऱ्या कांद्याची शेती उघडणार शेतकऱ्यांचे नशीब, जाणून घ्या शेतीची योग्य पद्धत
10 गुंठे जमिनीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा, तुकडाबंदी कायद्यात बदल
Published on: 17 August 2023, 10:42 IST