News

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये अनेकांनी यश मिळवले आहे. असंच यश एका शेतमजुराच्या कुटुंबातील मुलाने मिळवले आहे. अचिंता शेऊली असं या मुलाचे नाव असून त्याने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ७३ किलो भारोत्तोलन स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले आहे.

Updated on 02 August, 2022 3:22 PM IST

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये अनेकांनी यश मिळवले आहे. असंच यश एका शेतमजुराच्या कुटुंबातील मुलानेही मिळवले आहे. अचिंता शेऊली असं या मुलाचे नाव असून त्याने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ७३ किलो भारोत्तोलन स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले आहे. त्यामुळे या गोल्डन बॉयची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

या गोल्डन बॉयची कामगिरी जितकी कौतुकास्पद आहे तितकीच भावस्पर्शीसुद्धा. बंगालच्या हगळी शहरात राहणारे अचिंता शेऊली यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. अचिंता शेऊली याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी त्याच्या मोठ्या भावाने स्वतःच्या स्वप्नांवर पाणी फेरले. तसेच भावाला योग्य आहार मिळावा यासाठी शेतीकाम सुरु केले.

एप्रिल २०१३ला वडिलांचे निधन झाले तेव्हा अचिंताच्या कुटुंबाकडे अंत्यसंस्कारालादेखील पैसे नव्हते. वडील गेल्यानंतर मोठ्या भावाने आणि आईने मोलमजुरी करण्यास सुरुवात केली. आईने आणि मोठ्या भावाने आलोकने शेतमजुरी करत त्याला या यशापर्यंत पोहचण्यास मदत केली आहे. कुटुंबाच्या त्यागामुळे, त्यांच्या परिश्रमामुळे आज देशाला सुवर्णपदक मिळाले आहे.

२०१४ मध्ये अचिंताला पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळाला. कालांतराने त्याला राष्ट्रीय शिबिरात स्थान मिळाले त्यामुळे आहाराच्या खर्चाची चिंता मिटली. २०१८ ला अचिंताची खेलो इंडिया योजनेत निवड झाली तेव्हापासून त्याला पॉकेटमनी मिळू लागला. आता तो केंद्र शासनाच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेत आहे. त्याच्या शांतचित्तवृत्तीमुळे एन. आय. एस पतियाळा येथे अचिंताची 'मिस्टर शांतचित्त' अशी ओळख तयार झाली आहे.

Crop Production: 'या' पाच पिकांच्या शेतीमधून शेतकरी कमवतोय लाखों रुपये; जाणून घ्या 'या' पिकांविषयी...

त्यांच्या कुटुंबाच्या या कठोर परिश्रमाबद्दल आणि त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:
pakistan news; आता पाकिस्तानही झाला कंगाल, देशावर आली आतापर्यंतची सर्वात वाईट वेळ, कोणी कर्जही देईना
Fertilizers: शेतकरी मित्रांनो पिकांना खत देताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या; होईल फायदाच फायदा

English Summary: Common wealth Games: Golden achievement of a farmer's son; President and Prime Minister patted on the back
Published on: 02 August 2022, 03:18 IST