News

राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपासून त्यांच्या मंत्रालयात असलेल्या दालनातून कामकाज सुरू केले. आज मंत्रालयामध्ये दाखल होताच त्यांनी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यासाठी त्यांनी खास बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये ऍग्रीबिझनेस सोसायट्या निर्माण करून 19 लाख शेतकऱ्यांना मदत होणाऱ्या जे काही शेती संबंधित प्रकल्प आहेत त्यांना फास्ट ट्रॅक वर आणण्याचे निर्देश देण्यात आलेत.

Updated on 08 July, 2022 12:46 PM IST

यावेळी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की 2019 साली बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात स्मार्ट प्रकल्प मंजूर करण्यात आला होता.

या प्रकल्पाच्या अंतर्गत दहा हजार ऍग्रीबिझनेस सोसायट्या तयार करून  या माध्यमातून जवळजवळ 19 लाख शेतकऱ्यांना मदत करण्याचे एकंदरीत नियोजन होते.

नक्की वाचा:Eknath Shinde: शिवसेना पुन्हा फुटणार..! 18 पैकी 12 खासदार शिंदे गटात जाणार

या प्रकल्पाला जागतिक बँकेने देखील 3 हजार कोटी रुपयांची मदत केली होती. परंतु दुर्दैवाने आपण गेल्या अडीच वर्षात या प्रकल्पासाठी 15 कोटी रुपये खर्च करू शकलो.

त्यासाठी आता हा प्रकल्प जलदगतीने होण्यासाठी आज बैठक झाली. जागतिक बँकेचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.

शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पिकांची मूल्य साखळी तयार करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून फार फायदा होणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

तसेच आजच्या झालेल्या बैठकीत राज्यामध्ये सध्या असलेली पूरस्थिती तसेच मराठवाड्यामधील पाणी टंचाई यावर देखील चर्चा करण्यात आली.

नक्की वाचा:फडणवीस की फर्नांडिस? बंडखोरांचा अनोखा प्रताप, उपमुख्यमंत्र्यांच्या नावातच केला मोठा घोळ

 या समस्या सोडवण्यासाठी च्या प्रकल्पांचा देखील आढावा घेण्यात आला. याविषयी बोलताना ते म्हणाले की,आज जागतिक बँकेसोबत आणखी एक बैठक झाली.

मागील काही काळात सांगली आणि कोल्हापूर ला पूर आला होता व अशी पूरस्थिती दरवर्षी निर्माण होते.

या समस्येवर उपाय म्हणून काय करता येईल यासाठी आपण अभ्यास केला होता व जागतिक बँकेच्या मदतीने एक अँप्रोव्हल घेतले होते

यामध्ये वळण बंधारे आणि टनेल्स त्यांच्या माध्यमातून पाणी मराठवाड्याकडे वळवता  येईल का? यावर अभ्यास करण्यात आला अशी देखील माहिती फडणवीस यांनी दिली.

नक्की वाचा:Pm Kisan News: भावांनो! पटापट करा 'या' तीन गोष्टी,नाहीतर यादीतून नाव वगळले जाऊ शकते,वाचा माहिती

English Summary: Cm eknath shinde take decision about smart project that get benifit to farmer
Published on: 08 July 2022, 12:46 IST