News

दोन दिवसांपूर्वी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे अपघाती निधन झाले. यामुळे अनेकांना मोठे दुःख झाले. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत आता चौकशी केली जात आहे. अनेकांनी या अपघातावर संशय व्यक्त केला आहे. विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी केलेल्या दाव्यांमुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.

Updated on 18 August, 2022 1:55 PM IST

दोन दिवसांपूर्वी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे अपघाती निधन झाले. यामुळे अनेकांना मोठे दुःख झाले. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत आता चौकशी केली जात आहे. अनेकांनी या अपघातावर संशय व्यक्त केला आहे. विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी केलेल्या दाव्यांमुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.

याबाबत ते म्हणाले, अपघात घडला त्या दिवशी टोलनाक्यावरून गाडी गेली होती त्यामध्ये विनायक मेटे दिसत नव्हते, तसेच बाळासाहेब चव्हाण यांनी मेटेंच्या गाडीचा चालक एकनाथ कदम यांच्यावरही संशय व्यक्त केला. अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर एकनाथ कदम यांनी फोनवर चुकीची माहिती दिली. यामुळे आता पुढे काय होणार याकडे याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ज्या दिवशी विनायक मेटे यांचा अपघात झाला होता, त्या वेळेस मी आणि शिवसंग्रामचे प्रवक्ते तुषार काकडे हे गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या दिशेने निघालो होतो, असे बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले. माझ्या परिचयातील एका व्यक्तीला फोन केला. त्याने मला सांगितले की, ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षक यांना काहीही झाले नाही, मात्र विनायक मेटे याचे जागीच निधन झाले.

Farming Technique: आता करा जमिनीखाली आणि जमिनीवर दुहेरी शेती, ही पद्धत अवलंबल्यास मिळेल बक्कळ पैसा..

मी ड्रायव्हर एकनाथ कदम यांना फोन केला होता. ते म्हणाले, साहेब बरे आहेत, साहेबांना काही झाले नाही, मी २० मिनिटे साहेबांसोबत बोलतोय, अशी माहिती ड्रायव्हर एकनाथ कदम यांनी दिली. मात्र, मी विनायक मेटे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन उचलला नाही, यामुळे काय समजायचे असा प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या पोलिसांकडून सध्या चालक एकनाथ कदम याची कसून चौकशी केली जात आहे.

मोदी सरकारची मोठी घोषणा! आता कृषी कर्जावरील व्याजात मिळणार मोठी सूट

विनायक मेटे यांच्या गाडीला धडक देणाऱ्या ट्रक चालकाला समोर बसवून या दोघांची चौकशी केली जाणार असल्याचे जात आहे. या चौकशीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी या सगळ्याबाबत संशय व्यक्त केला होता. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
कोरोना वाढतोय! प्रवाशांना पुन्हा मास्क सक्ती, वाचा आता नवीन नियम..
पुणे लोकसभा मतदार संघात फडणवीसांसाठी चाचपनी, केंद्रात दिली मोठी जबाबदारी
Nashik: नाशिकच्या शेतकऱ्याचा इस्राईल पॅटर्न! मत्स्यपालनातून होतेय लाखोंची कमाई..

English Summary: claim Vinayak Mete's nephew caused excitement!, Vinayak Mete was not in the car then...
Published on: 18 August 2022, 01:55 IST