News

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे व्यापारी आणि शेतकरी याचे मोठे नुकसान झाले आहे. येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Kalmana Agricultural Produce Market Committee Nagpur) परिसरात भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही घटना मध्यरात्री दोन वाजन्याच्या सुमारास घडली.

Updated on 23 November, 2022 10:45 AM IST

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे व्यापारी आणि शेतकरी याचे मोठे नुकसान झाले आहे. येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Kalmana Agricultural Produce Market Committee Nagpur) परिसरात भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही घटना मध्यरात्री दोन वाजन्याच्या सुमारास घडली.

यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. यामध्ये लाल मिरची होती. (Red chili)ती जळून खाक झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या आगीच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये बाजार समिती प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण देखील होते. काही वेळानंतर ही आग आटोक्यात आली.

या घटनेची माहती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. नागपूर कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही नागपूरच्या वेशीवर आहे. तिथपर्यंत अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत आग चांगलीच पसरली होती. यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी मिरचीचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Vst शक्ती MT 932DI ट्रॅक्टर लहान शेतकऱ्यांसाठी एक चमत्कार, शेतकऱ्यांना होतोय फायदा..

शॉर्टसर्किटमुळं आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीत जळून खाक झालेली मिरची शेतकऱ्यांची होती. त्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं आगीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. यामध्ये चार ते पाच हजार पोती लाल मिरची जळून खाक झाल्याची माहिती आहे.

इंडोनेशियामध्ये भूकंपाचा कहर, 162 ठार शेकडो जखमी..

दरम्यान, या मिरचीची किंमत ही १५ कोटींपेक्षा जास्त होती. ४० व्यापाऱ्यांचा हा साठा असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे हे मोठे नुकसान आहे. अधिकऱ्यानी याची पाहणी केली आहे. यामुळे आता भरपाई मिळणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
माळेगाव कारखान्याचा निर्णय उच्च न्यायालयानेही फेटाळला, पवार समर्थकांना मोठा धक्का..
शेतकऱ्यांची परिस्थिती बघून कृषिमंत्र्यांचा थेट अधिकाऱ्यांना फोन, महावितरणने थांबवली वसुली
रोजगार मेळावा प्रारंभ, 75 हजार उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरीत, मोदींची घोषणा..

English Summary: Chilli worth crores burnt in Nagpur, huge loss to farmers..
Published on: 23 November 2022, 10:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)