Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच आहे. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे तर काही भागात खरीप पिकांचे (Kharif crop) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र राज्यातील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला असल्यामुळे राज्याला नवे कृषिमंत्री मिळाले आहेत. पावसाळी अधिवेशनात (Monsoon session) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने नुकसान भरपाई द्यावी या आशेने शेतकरी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडे पाहत आहेत. अधिवेशात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेतकरी आत्महत्या या मुद्यावरून सरकारला घेणाऱ्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना भावनिक पत्र लिहीत आत्महत्या न करण्याचे आव्हान केले आहे.
अतिवृष्टीमुळे ३३ टक्के नुकसान झाल्यास नुकसान भरपाई (compensation for damages) मिळणार असल्याची मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. हीच नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर होऊ नये तसेच पंचनाम्यासाठी ॲप सुरु करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.
शिंदे सरकारचे पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय; वाचा सविस्तर
मान्सून पूर्व काही खरीप पिकांची पेरणी करण्यात आली होती. तसेच मान्सूनचा पाऊस झाल्यानंतरही काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर अशा पिकांची पेरणी केली होती. मात्र या पिकांवर यलो मोझॅक सारख्या रोगांनी आक्रमण केल्यामुळे सोयाबीनची अनेक पिके उध्वस्त झाली आहेत. याबाबतही मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.
Tur Rate: तूर उत्पादकांचे अच्छे दिन! बाजारात तुरीला विक्रमी दर, इतके दिवस राहणार तुरीचे दर तेजीत
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकट तसेच दुबार पेरणीला सामोरे जावे लागत आहे. नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे लवकरात लवकर व्हावे यासाठी मोबाईल ॲप सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! शेती विकूनही कर्ज संपेना; एकाच साडीला पती-पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या
Green Pea Farming: ऑफ सीझनमध्ये वाटाणा पिकातून मिळेल भरघोस नफा; वापरा ही खास पद्धत...
Published on: 24 August 2022, 03:03 IST